Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole, Modi: 'त्या गुंडाची फोटोसकट माहिती प्रसिद्ध करा; नाना पटोलेंना भाजपकडून खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 13:20 IST

एका सभेत बोलताना नाना पटोले यांनी मोदी या नावावरून एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे भाजप भलतीच आक्रमक झाली आहे.

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असं त्यांनी विधान केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं. मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून मी आमच्या विभागातील एका मोदी नावाच्या गुंडाबद्दल बोललो होतो, असं स्पष्टीकरण त्यांनी ट्वीट करून दिलं. त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही भाजप आक्रमक असून पटोले यांचा खुलासा खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केला आहे. तसेच, त्यांना एक खुलं आव्हानदेखील दिलं आहे.

'मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे, असा आरोप माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. ‘नाना पटोलेनी त्या गावगुंडाचा फोटो आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी, असं आव्हानदेखील भांडारी यांनी दिलं.

"स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष वापरत नाहीत, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतात, ही वस्तुस्थिती भयावह आहे. कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही आणि केवळ खूनखराब्याचे राजकारण करणे हाच काँग्रेसचा स्वभाव आहे हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ हिंसाचारावर अवलंबून असणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचे नाना पटोले हे अस्सल प्रतिक आहेत", अशी घणाघाती टीका भांडारींनी केली.

टॅग्स :नाना पटोलेभाजपानरेंद्र मोदीकाँग्रेस