माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी अमेरिकेतील 'जेफ्री एपस्टीन' प्रकरणी मोठे दावे केले होते. यामुळे चव्हाण चर्चेत होते. चव्हाण यांची 'टीओडी मराठी' या युट्यूब चॅनेलने विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री काळातील अनुभव आणि किस्से सांगितले आहेत. मुख्यमंत्री काळात त्यांची मुलांनी कधीही राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप केला नसल्याचे त्यांनी सांगितले.
या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या मुलांच्या राजकारणाबाबत प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले, मी माझ्या मुलाला आधीच सांगितलं आहे, तुला जे हवे ते कर. पण राजकारण करायचे असेल तर सुरुवातीपासूनच केले पाहिजे, अचानक माझा मुलगा म्हणून करायला चालणार नाही. माझ्या मुख्यमंत्री काळात असताना तु इकडे काही व्यवसाय करायचा नाही असे सांगितले होते. त्यानेही ते लगेच ऐकले. त्याने माझ्या पदाचा कधीही गैरवापर केला नाही. मुलगा मला वर्षा बंगल्यावर भेटायला यायचा तेव्हा तो टॅक्सीने यायचा, वर्षावरचे पोलिस त्याची टॅक्सी अडवायचे, ही आठवण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितली.
"एकदा त्याने ऊर्जा खात्याकडे अजित पवार यांच्याकडे बैठकीला गेला होता. मला त्यावेळी ही गोष्ट समजली. त्यावेळी मी त्याला इकडे सांगितले होते की इकडे काही काम करायचं नाही . त्यानेही माझे ऐकले. त्याचे दिल्लीतच जास्त वास्तव्य राहिले आहे. त्यांच्या काय महत्वकांक्षा होत्या, त्या काळात मला त्यांच्याकडे लक्ष देता आले नाही, असंही चव्हाण म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुले राजकारणापासून दूर
पृथ्वीराज चव्हाण यांची दोन्ही मुले राजकारणापासून दूर आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव जयसिंह असे आहे. जयसिंह यांनी पुण्यातील एमआयटी येथून इंजिनिअरींग केले आहे.
Web Summary : Ex-CM Prithviraj Chavan shared anecdotes from his tenure, emphasizing his son's non-interference in politics. His son even took a taxi to meet him, avoiding misusing his position. Chavan regrets not focusing on his son's ambitions.
Web Summary : पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ने अपने कार्यकाल के किस्से साझा किए, जिसमें बताया कि उनके बेटे ने राजनीति में हस्तक्षेप नहीं किया। बेटा उनसे टैक्सी में मिलने आता था, पद का दुरुपयोग नहीं करता था। चव्हाण को बेटे की महत्वाकांक्षाओं पर ध्यान न देने का अफसोस है।