मुंबईला मिळणार पाणीच पाणी! पाणी पुरवठ्यासाठी २ हजार ४०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 09:50 AM2024-02-03T09:50:28+5:302024-02-03T09:54:08+5:30

आता मुंबईकरांची पाणी चिंता अखेर मिटणार आहे.

Mumbai will get enough water 2 thousand 400 crores for water supply from bmc | मुंबईला मिळणार पाणीच पाणी! पाणी पुरवठ्यासाठी २ हजार ४०० कोटी

मुंबईला मिळणार पाणीच पाणी! पाणी पुरवठ्यासाठी २ हजार ४०० कोटी

सचिन लुंगसे, मुंबई : मुंबईतील जलशयांची पालिकेकडून दुरुस्ती केली जाणार आहे. भांडूप, पवई, मलबार टेकडी, भंडारवाडी, ट्रॉम्बे, बोरीवली टेकडी, मालाड टेकडी या जलशयांच्या दुरुस्तीसाठी २१७.५४ कोटींची तरतूद आहे.

पिण्याच्या पाण्यात रूपांतर :

कुलाबा येथील मलजल प्रक्रिया केंद्रातील अवजलावर प्रक्रिया करून त्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर केले जाईल. १२ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पासाठी २० कोटींची तरतूद आहे.

पाणी गोड होणार :

समुद्रातील पाणी गोडे करण्यासाठी २०० दशलक्ष लिटर निःक्षारीकरण प्रकल्प बांधला जाईल. यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा मागविण्यात आली असून, याकरिता ३५० कोटीची तरतूद आहे.

चेंबूरसह गोवंडीला पाणी मिळणार :

अमर महल ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंत जल बोगदा बांधला जाणार असून, हे काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. यामुळे चेंबूरसह गोवंडीलगतच्या पाणी पुरवठ्यात वाढ होईल. यासाठी ७० कोटींची तरतूद आहे.

मध्य मुंबईत धो धो पाणी :

अमर महल ते वडाळा आणि पुढे परळपर्यंत जलबोगदा बांधला जात असून, हे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल, यामुळे पूर्व उपनगर, मध्य मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ होईल. यासाठी २८० कोटींची तरतूद आहे.

Web Title: Mumbai will get enough water 2 thousand 400 crores for water supply from bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.