मुंबई@३८.४! ‘उष्ण लाटे’ने होरपळ; मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 07:17 PM2020-02-27T19:17:55+5:302020-02-27T20:07:27+5:30

राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. चालू मौसमातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान आहे

Mumbai Weather Update The highest temperature recorded in Mumbai | मुंबई@३८.४! ‘उष्ण लाटे’ने होरपळ; मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद 

मुंबई@३८.४! ‘उष्ण लाटे’ने होरपळ; मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद 

Next
ठळक मुद्देमुंबईचे कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई : एप्रिल आणि मे असे दोन उन्हाच्या तडाख्याचे महिने कोसो दूर असतानाच फेब्रूवारी महिना मात्र मुंबईकरांचा घाम काढू लागला आहे. २७ फेब्रूवारी रोजी म्हणजे गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. चालू मौसमातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान आहे. गेल्या १० वर्षांतील आतापर्यंत नोंदविण्यात आलेले हे तिसरे सर्वाधिक कमाल तापमान आहे.

रत्नागिरी येथे ३८ अंश एवढया कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पूर्वेकडील वारे, आर्द्रतेमधील चढउतार, विलंबाने स्थिर होणारे समुद्री वारे; या कारणांमुळे मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारीदेखील तापमान वाढीची हिच स्थिती कायम राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होईल. उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असा इशारा गुरुवारी सकाळीच हवामान खात्याने दिला होता.

१७ फेब्रूवारी रोजी मुंबईचे कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

२५ फेब्रूवारी रोजी मुंबईचे कमाल तापमान ३७.४ अंश नोंदविण्यात आले.

२५ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३९.६ अंश नोंदविण्यात आले होते. 

२३ फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३८.८ अंश नोंदविण्यात आले होते.

१९ फेब्रुवारी २०१७ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३८.८ नोंदविण्यात आले होते.

२२ फेब्रुवारी २०१२ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३९.१ अंश नोंदविण्यात आले होते.

मुंबई ३८.४

रत्नागिरी ३८

सोलापूर ३५.२

अहमदनगर ३५.४

डहाणू ३६.४

वेंगुर्ला ३८

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Voilence : दिल्लीत केजरीवालांची 'फरिश्ते' योजना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, जखमींना मोफत उपचार

Delhi Voilence : 'दुसऱ्यांना वाचवण्याच्या नादात माझ्या मुलाने जीव गमावला'

China Coronavirus : जगाला 'कोरोना'चा विळखा! आरोग्यमंत्र्यांनाच झाली लागण

Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण'

Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी

 

Web Title: Mumbai Weather Update The highest temperature recorded in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.