Mumbai Video: 'तू बडबड बंद कर'; बेस्ट कंडक्टरची प्रवाशाला मारहाण, बसमधील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:55 IST2025-03-31T18:54:13+5:302025-03-31T18:55:04+5:30

मुंबईतील बेस्टमध्ये एका कंडक्टरने व्हिडीओ शूटिंग करत असलेल्या एका प्रवाशाला मारहाण केली. दोघांमध्ये वाद सुरू असताना तरुणाने व्हिडीओ शूटिंग सुरू केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Mumbai Video: 'Stop talking'; BEST conductor beats up passenger, video from bus goes viral | Mumbai Video: 'तू बडबड बंद कर'; बेस्ट कंडक्टरची प्रवाशाला मारहाण, बसमधील व्हिडीओ व्हायरल

Mumbai Video: 'तू बडबड बंद कर'; बेस्ट कंडक्टरची प्रवाशाला मारहाण, बसमधील व्हिडीओ व्हायरल

दररोज कुठले ना, कुठले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी ते हलके फुलके असतात, तर कधी हाणामारीचे. मुंबईतील बेस्टमधील एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला असून, यात बेस्ट बसमधील कंडक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याचे दिसत आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ बेस्टमधील आहे. यात कंडक्टर आणि दोन प्रवाशी तरुणांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. वाद सुरू झाल्यानंतर हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. त्यामुळे वादाचे कारण कळू शकलेले नाही. 

पण, दोन तरुण प्रवाशी आणि कंडक्टरमध्ये तिकीट आणि उतरण्यावरून वाद झाल्याचे दिसत आहे. कारण दोघांमधील संवाद त्यावरूनच होत आहे. 

व्हिडीओमध्ये काय?

व्हिडीओची सुरूवात होते, त्यावेळी कंडक्टर प्रवाशाला म्हणत आहे की, 'तुला मी उतर बोलतच नाही.' त्यानंतर प्रवाशी कंडक्टरला हात लावून बोलतो, 'उतरायचं का आहे पण?' 

त्यानंतर कंडक्टर मागे वळतो आणि प्रवाशाला जोरात चापट मारतो. त्यानंतर 'व्हिडीओ शूटिंग बंद कर', असे कंडक्टर प्रवाशाला म्हणतो. त्यानंतर तो दोन तीन वेळा शूटिंग बंद कर म्हणतो. 

त्यानंतर एक प्रवाशी मध्यस्थी करतो आणि कंडक्टरला दूर करतो. त्यानंतर मध्यस्थी करणारा व्यक्ती विचारतो की का बडबड करत आहात? त्यानंतर कंडक्टरही त्या तरुणाला बोलतो की, 'बडबड करू नकोस. शांत बस.' 


काही दिवसांपूर्वी बेस्टचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका दुचाकीवाल्यासोबत बेस्ट चालकाचा वाद झाला होता. बस चालवत असतानाच ही घटना घडली. त्यानंतर संतापलेला चालक बॅग आणि हेल्मेट घेऊन बस सोडून निघून जातो. 

Web Title: Mumbai Video: 'Stop talking'; BEST conductor beats up passenger, video from bus goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.