Mumbai Rains Updates : मुंबईतील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 02:04 PM2021-06-09T14:04:48+5:302021-06-09T14:10:24+5:30

Mumbai Rains Updates : मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले. 

Mumbai Rains Updates Heavy rain in mumbai Maharashtra; CM asks officials to stay alert | Mumbai Rains Updates : मुंबईतील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे निर्देश 

Mumbai Rains Updates : मुंबईतील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे निर्देश 

Next

मुंबई - हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले. 

कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुंबईत पंपींग स्टेशन्स कार्यरत राहतील व साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहावे तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. 

Web Title: Mumbai Rains Updates Heavy rain in mumbai Maharashtra; CM asks officials to stay alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.