Mumbai Rains: मुंबईत रेड अलर्ट! मुख्यमंत्री ठाकरे तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षात, घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 16:50 IST2021-06-09T16:46:27+5:302021-06-09T16:50:09+5:30
Mumbai Rains: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली.

Mumbai Rains: मुंबईत रेड अलर्ट! मुख्यमंत्री ठाकरे तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षात, घेतला आढावा
मुंबईत आज पहिल्याच पावसात नागरिकांची त्रेधातिरपीट उडालेली पाहायला मिळाली. मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं. यावरुन राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेवर भाजपकडून आरोप केले जात आहेत. त्यात हवामान विभागानं आज मुंबईसाठी रेड अलर्ट घोषीत केला आहे. तर पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट सांगितला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली.
मुंबईत पाणी तुंबणारच! महापालिका आयुक्त चहल यांनी नेमकं कारण सांगितलं...
मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी मुंबईत पाणी साचलेल्या भागांची माहिती घेतली आणि सर्व प्रशासनाला पाण्याचा निचरा तातडीनं कसा करता येईल याबाबतच्या सूचना दिल्या. आपत्ती निवारण कक्षात मुंबईतील पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचं फुटेज पाहता येतं. याचीच सविस्तर माहिती घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सध्या कोणकोणत्या परिसरात पाणी साचलं आहे याची माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त @IqbalSinghChah2 यांनी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि विविध उपाययोजनांची त्यांना माहिती दिली. pic.twitter.com/4nmgZaZUhI
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 9, 2021
मुंबईला रेड अलर्ट! पुढील ४ ते ५ दिवस कोकण किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनीही मुख्यमंत्र्यांना पालिकेकडून केल्या गेलेल्या कामांची आणि पाहणीची माहिती दिली. इक्बाल सिंह चहल यांनी नुकतंच हिंदमाता येथे थेट रस्त्यावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट देण्यासाठी ते आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोहोचले.
मुंबईत पुढील पाच दिवस पावसाचे, कोकण किनारपट्टीलाही इशारा
हवामान विभागानं आज मुंबईला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यात पुढील चार दिवस देखील मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट म्हणून घोषीत करण्यात आले आहे. याकाळात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीला येत्या चार दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार होणार आहे, असं हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी सांगितलं आहे.