Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:25 IST2025-08-19T09:08:14+5:302025-08-19T11:25:10+5:30

Mumbai Rain Live News Update in Marathi: मुंबई आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

mumbai rains live updates imd issues red alert check local train status traffic and waterlogging news in city | Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले

Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले

Mumbai Rain Updates Live: मुंबई आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने सुरू आहे. पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आवश्यकता नसेल, तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून केले जात आहे. पाहा, मुंबईतील पावसाच्या सद्यस्थिती आणि लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

19 Aug, 25 : 11:34 AM

मुंबईकरांनो काळजी घ्या. मिठी नदीने गाठली धोक्याची पातळी

19 Aug, 25 : 11:30 AM

मुसळधार पावसामुळे ठाणे, नवी मुंबई, पनवेल मार्ग ठप्प

मुसळधार पावसामुळे ठाणे, नवी मुंबई, पनवेल मार्ग ठप्प. मुसळधार पावसामुळे ठाण्याहून नवी मुंबईकडे व पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक कळवा येथे ठप्प. ठाणे, नवी मुंबई, पनवेल मार्गावरील विटावा उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प. वाहनांच्या रांगा थेट कळवा ते ठाणे इथपर्यंत लागल्या.

19 Aug, 25 : 11:25 AM

कुर्ला कमानी परिसरात साचले पाणी

कुर्ला कमानी विभागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी भरले आहे. एलबीएस मार्गला कमानीशी जोडणारा काळे रस्ता पाणी भरल्याने ठप्प झाला आहे. सुमारे तीन ते चार फूट पाणी भरले आहे. इथल्या दुकानात पाणी भरल्याने दुकाने बंद करण्यात आली आहे.

19 Aug, 25 : 11:24 AM

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु, भरतीमुळे समुद्रालाही उधाण

19 Aug, 25 : 11:22 AM

मुंबईत पावसाचा कहर, दादर टीटी परिसरात साचलं पाणी, वाहतूक रखडली

19 Aug, 25 : 11:16 AM

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांसाठी रेल्वे प्रशासनाकडून ‘सुरक्षा संकेत’ जारी

हवामान खात्याने दिलेल्या ‘रेड अलर्ट’ च्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांसाठी ‘सुरक्षा संकेत’ जारी केले आहेत. पावसाळ्यात प्रवास करताना प्रवाशांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. फूटबोर्डवर उभे राहून प्रवास न करणे, रुळांवर पाणी साचल्यास रुळ ओलांडू नये, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे तसेच संयम ठेवावा अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

19 Aug, 25 : 11:14 AM

मुंबईत मुसळधार पावसाचा लोकल ट्रेन वाहतुकीवर परिणाम

19 Aug, 25 : 11:08 AM

लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले

लोकमत इम्पॅक्ट: लोकमत वृत्ताची दखल घेत दखल घेत परिमंडळ ४ च्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे आणि पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त अजय पाटणे यांनी गोरेगाव पूर्व ओबेरॉय मॉलसमोर जास्त पंप लावून येथील साचलेले पाणी काढले आणि नागरिकांना आणि वाहन चलकांना मोठा दिलासा दिला.

19 Aug, 25 : 11:04 AM

पश्चिम उपनगरात काल सकाळी ८ वाजल्यापासून आज सकाळी ८ वाजेपर्यंत कुठे किती पाऊस झाला?

मुंबईत काल १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ ते आज १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत (२४ तास) पावसाची सर्वाधिक नोंद झालेली ठिकाणे.

पश्चिम उपनगरे (पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये)

१) चिंचोली अग्निशमन केंद्र - ३६१
२) कांदिवली अग्निशमन केंद्र - ३३७ 
३) दिंडोशी वसाहत महानगरपालिका शाळा - ३०५
४) मागाठाणे बस आगार - ३०४
५) वेसावे उदंचन केंद्र - २४०

19 Aug, 25 : 11:00 AM

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प

मध्य रेल्वेची लोकल खोळंबली, सायन-दादर स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

19 Aug, 25 : 10:48 AM

मुंबई मुसळधार पाऊस कायम, पवईत पाणी साचले

पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. मुंबई शहर, उपनगर आणि लगतच्या परिसरात पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पवईतील काही भागांमध्ये पाणी साचले. यामुळे वाहतूक मंदावली. पाण्यातून वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

19 Aug, 25 : 10:41 AM

मुंबईत मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्व वेस्टन एक्सप्रेस हायवे टोल नाका येथील परिसर जलमय

19 Aug, 25 : 10:33 AM

मुंबई शहरातील मुसळधार पावसामुळे मरीन ड्राइव्हवर भरती काळात मोठ्या लाटा

19 Aug, 25 : 10:18 AM

मुसळधार पावसाने गोरेगाव (पूर्व) ओबेरॉय मॉल समोरील जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग आणि येथील पश्चिम दुर्तगती महामार्ग जंक्शन वर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून येथील रस्त्याला जणू तलावाचे स्वरूप आले.

19 Aug, 25 : 10:09 AM

मिठी नदी परिसरातील १४० घरे व नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारी

मिठी नदीची पातळी ३.७ मीटर पर्यंत पोहचली आहे. मिठी नदी परिसरातील १४० घरे व नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारी पालिका करणार.....

19 Aug, 25 : 10:08 AM

दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्र नगर सबवे, अँटॉप हिल या ठिकाणी एमजी आर चौक, कानेकर नगर, सरदार नगर,  प्रतीक्षा नगर या भागात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साठले असल्याने  वाहतूक संथगतीने सुरू आहे .

19 Aug, 25 : 10:07 AM

मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील सखल भागांत पाणी; वाहतूक मंदावली

गोल देऊळ, गुलालवाडी, वडाळा, शिवडी, नबाब  टॅन्क, नागपाडा, मराठा मंदिर, भायखळा, बावला कंपाऊंड, भोईवाडा, वडाळा  स्टेशन चार रस्ता, हिंदमाता जंक्शन, माटुंगा या भागात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साठले असल्याने  वाहतूक संथगतीने सुरू आहे. 

19 Aug, 25 : 09:59 AM

मुंबईत तुफान पाऊस; पाहा, दादर स्थानकातील सद्यस्थिती

19 Aug, 25 : 09:53 AM

मुंबई पोलीस ऑन ड्युटी! साचलेल्या पाण्यातून वाट काढणाऱ्या वृद्ध महिलेला केली मदत

19 Aug, 25 : 09:49 AM

मुंबईतील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाणी साचले; वाहतुकीला फटका

मुंबईतील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा फटका वाहतुकीला बसत आहे.

19 Aug, 25 : 09:44 AM

मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वे पाण्याने भरला, वाहतूक बंद

19 Aug, 25 : 09:38 AM

मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबईला पावसाने झोडपले

नवी मुंबईत जोरदार पावसामुळे एपीएमसी भाजीपाला मार्केट आवारात पाणी साचण्यास सुरुवात. मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे.

19 Aug, 25 : 09:34 AM

खासगी कार्यालये, आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज करण्याच्या सूचना द्याव्यात

भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे.

या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात येत आहे.

तसेच, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

19 Aug, 25 : 09:33 AM

मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली

19 Aug, 25 : 09:32 AM

मुंबईत दिवसभरात भरती-ओहोटीची वेळ कोणती?

मुंबई शहर व उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह अधूनमधून ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

भरती -
सकाळी ९:१६ वाजता - ३.७५ मीटर

ओहोटी -
दुपारी ३:१६ वाजता - २.२२ मीटर   

भरती 
रात्री ८:५३ वाजता - ३.१४ मीटर 

ओहोटी -
मध्यरात्रीनंतर ०३:११ वाजता (उद्या, २० ऑगस्ट २०२५) - १.०५ मीटर

19 Aug, 25 : 09:30 AM

मुंबई शहर, उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता

19 Aug, 25 : 09:28 AM

नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे; मुंबई महापालिकेचे आवाहन

19 Aug, 25 : 09:28 AM

मुंबई पूर्व उपनगरे आज सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद

पूर्व उपनगरे (पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये)

१) मुलुंड अग्निशमन केंद्र - १०० 
२)  गव्हाणपाडा अग्निशमन केंद्र - ९५
३) विना नगर महानगरपालिका शाळा - ९३
४) चेंबूर अग्निशमन केंद्र - ९०
५)  इमारत प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी - ८७

19 Aug, 25 : 09:27 AM

मुंबई शहरात आज सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद

मुंबई शहर (पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये)

१) फॉर्सबेरी जलाशय, एफ दक्षिण कार्यालय - १०९
२) पर्जन्य जलवाहिन्या कार्यशाळा, दादर - १०३
२) बी नाडकर्णी महानगरपालिका शाळा, वडाळा - ९९
३) नायर रूग्णालय - ९४
४) सीआयडीएम, परळ - ८९

19 Aug, 25 : 09:26 AM

मुंबईत आज सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद

पश्चिम उपनगरे (पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये)

१) चिंचोली अग्निशमन केंद्र - १०७
२) वर्सोवा उदंचन केंद्र - १०६ 
३) दिंडोशी वसाहत महानगरपालिका शाळा - ९७
४)  सुपारी टॅंक महानगरपालिका शाळा, वांद्रे - ९५
५) कांदिवली अग्निशमन केंद्र - ९२

19 Aug, 25 : 09:25 AM

मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे समजते.

19 Aug, 25 : 09:24 AM

मुंबई पोलिसांकडून सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन

आज होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असाल अशी आशा आहे. कृपया काळजी घ्या, गरज असेल तरच बाहेर पडा, भरतीच्या वेळी किनाऱ्याजवळ जाणे टाळा, अशा सूचना मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी आम्ही तुमच्या जवळ असू हे विसरू नका, असे मुंबई पोलीस विभागाने नागरिकांना आश्वस्त केले आहे. तसेच खाजगी क्षेत्राला शक्य तितके घरून काम करण्याची परवानगी देण्याची विनंती आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

19 Aug, 25 : 09:19 AM

मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईतील वांद्रे-खार लिंक रोडवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला.

19 Aug, 25 : 09:14 AM

दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार; शाळांना सुट्टी

हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा, खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने  आज शाळांना केली  सुट्टी जाहीर.

19 Aug, 25 : 09:13 AM

हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर वाढल्याने हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला.

19 Aug, 25 : 09:12 AM

पश्चिम उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस

पश्चिम उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. पाण्याची पातळी वाढल्याने बोरिवलीतील पोयसर सबवे वाहतुकीसाठी बंद 

19 Aug, 25 : 09:11 AM

मध्य रेल्वेवरील वाहतूक ३५ ते ४० मिनिटे उशिराने

मध्य रेल्वेच्या आंबिवली शहाड स्टेशन मध्ये तांत्रिक बिघाडामुळे पहाटेच्या दोन्ही ट्रेन ३५ ते ४० मिनिटे उशिरा धावत आहेत. सकाळी ४:१० ते ६ या कालावधीत बिघाड झाला होता.

19 Aug, 25 : 09:11 AM

मुंबई उपनगरांत मागील २४ तासात अतिवृष्टीची नोंद

विक्रोळी परिसरात सर्वाधिक २५५.५ मिमी पाऊस झाल्याची हवामान विभागाची माहिती. पुढील २४ तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा

Web Title: mumbai rains live updates imd issues red alert check local train status traffic and waterlogging news in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.