Mumbai: 'मुंबई वन' अॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 17:34 IST2025-11-06T17:32:42+5:302025-11-06T17:34:51+5:30
Mumbai One App Instant Cashback: 'मुंबई वन' अॅप वापरून २० टक्के इंस्टंट डिस्काउंट कसा मिळवायचा? जाणून घ्या

Mumbai: 'मुंबई वन' अॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 'मुंबई वन' अॅप वापरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि आकर्षक सवलत जाहीर केली आहे. 'मुंबई वन' अॅपद्वारे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना भीम यूपीआयद्वारे पेमेंट केल्यास २० टक्के त्वरित कॅशबॅक मिळणार आहे.
मुंबई वन अॅपद्वारे, मुंबईकर ११ सार्वजनिक वाहतूक ऑपरेटरमध्ये त्यांची तिकिटे बुक करू शकतात. या कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी, किमान २० रुपये व्यवहार आवश्यक आहे, असे एमएमआरडीएने त्यांच्या एक्सवरील अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रवाशांना महिन्यातून जास्तीत जास्त ६ वेळा हा कॅशबॅक मिळू शकतो. या व्यतिरिक्त, एमएमआरडीएने असेही सांगितले आहे की, ही ऑफर फक्त ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच मर्यादीत आहे.
Why just ride when you can earn while you ride? 😉
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) November 6, 2025
Travel Smart across MMR with the Mumbai One App.
Book your journey via the BHIM App and get 20% Instant Cashback!
📲 Download. Travel. Earn.
Minimum transaction: ₹20 | Cashback up to ₹10 | Max 6 times/month | Offer valid… pic.twitter.com/5bwtjZZkij
मुंबई वन वापरकर्ते मुंबई उपनगरीय रेल्वे, मुंबई मेट्रो लाईन्स १, २ अ, ३ आणि ७, मुंबई मोनोरेल, नवी मुंबई मेट्रो आणि बेस्ट, टीएमटी (ठाणे), एमबीएमटी (मीरा-भाईंदर), केडीएमटी (कल्याण-डोंबिवली) आणि एनएमएमटी (नवी मुंबई) च्या बस सेवांमध्ये क्यूआर कोड-आधारित डिजिटल तिकिट वापरून प्रवास करू शकतात.
मुंबई वन अॅपद्वारे तिकिटे 'कशी' बुक करावी?
- गुगल प्ले स्टोअर किंवा आयओएस स्टोअरवरून 'मुंबई वन' अॅप इन्स्टॉल करा.
- तिकीट बुक करण्यासाठी 'क्विक तिकीट'वर क्लिक करा.
- प्रवासासाठी हवी असलेली वाहतूक सेवा निवडा.
- पेमेंट करा आणि क्यूआर कोड-आधारित डिजिटल तिकीट मिळवा.
मोदींच्या हस्ते 'मुंबई वन' अॅप लॉन्च
वाहतुकीव्यतिरिक्त 'मुंबई वन' अॅप स्थानिक आकर्षणांची माहिती देखील देते. यात पर्यटन स्थळे, रेस्टॉरंट्स, गार्डन्स, मॉल्स, किराणा सामान आणि इंधन स्टेशन यांसह जवळपासच्या महत्त्वाच्या ठिकाणांची यादी उपलब्ध आहे. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अॅप लॉन्च झाल्यानंतर ७२ तासांच्या आत एकूण १.२५ लाखांहून अधिक डाउनलोड्सचा टप्पा गाठला होता.
मुंबई मेट्रो ३ दिव्यांग प्रवाशांना मोठी सवलत
यापूर्वी, मुंबई मेट्रो लाईन ३ चालवणाऱ्या एमएमआरसीने दिव्यांग प्रवाशांसाठी एक मोठी सवलत जाहीर केली होती. दिव्यांग प्रवाशांसाठी मासिक ट्रिप पासवर २५ टक्के सूट देण्याची योजना आखली गेली आहे, जी १० नोव्हेंबरपूर्वी लागू होण्याची अपेक्षा आहे.