BMC Budget 2025: मुंबई Eye प्रोजेक्ट, फाइव्ह स्टार हॉटेल अन् बरंच काही... मुंबईचं ७४ हजार कोटींचं 'श्रीमंत' बजेट सादर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:07 IST2025-02-04T13:06:38+5:302025-02-04T13:07:43+5:30

BMC Budget 2025 Highlights: देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई महानगरपालिकेचा वित्तीय वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्पीय अंदाज आज पालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आला आहे.

mumbai municipal corporation BMC announces Rs 74427 crore budget for FY 2025 26 | BMC Budget 2025: मुंबई Eye प्रोजेक्ट, फाइव्ह स्टार हॉटेल अन् बरंच काही... मुंबईचं ७४ हजार कोटींचं 'श्रीमंत' बजेट सादर!

BMC Budget 2025: मुंबई Eye प्रोजेक्ट, फाइव्ह स्टार हॉटेल अन् बरंच काही... मुंबईचं ७४ हजार कोटींचं 'श्रीमंत' बजेट सादर!

BMC Budget 2025 Key Announcements: देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई महानगरपालिकेचा वित्तीय वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्पीय अंदाज आज पालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आला आहे. यंदाचा मुंबई मनपाचा अर्थसंकल्प तब्बल ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प तब्बल १४.१९ टक्क्यांनी वाढला आहे. 

गेल्या वर्षी मुंबई पालिकेने ५९ हजार ९५४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. गतवर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १४ हजार ४६२ कोटी ६६ लाख रुपयांनी वाढला आहे. अर्थात याला आगामी पालिका निवडणुकीचीही किनार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील पायाभूत सुविधांसोबतच शिक्षण, पर्यटन आणि प्रदूषण यावरही मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. 

मुंबईसाठी विशेष वातावरणीय बदलासाठी ११३.१८ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. तर मुंबईमध्ये सुयोग्य जागी 'लंडन आय'च्या धरतीवरती सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत 'मुंबई आय' उभरण्यात येणार आहे. यासोबतच राणीच्या बागेतील प्राणी संग्रहालयात जिराफ ,झेब्रा, सफेद सिंह जॅग्वार इत्यादी विदेशी प्राण्यांसाठीची प्रदर्शनी उभारण्यात येणार आहे. शहरातील कोळीवाड्यांच्या विकास करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय 

मुंबईकरांना काय काय मिळणार? आणि कोणत्या तरतूदी?

- दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या उन्नत मार्गासाठी ४३०० कोटींची तरतूद 
- गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १९५८ कोटी रुपयांची तरतूद
- प्रभादेवी , भांडूप ,मुलुंड, जुहू , मालाड येथील एकूण ३२७८२ PAP सदनिकांच्या प्रस्तावांना मंजुरी
- दहिसर जकात नाक्याच्या जागेवर फाइव्ह स्टार हॉटेल उभारणार
- राणीच्या बागेत जिराफ ,झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार इत्यादी विदेशी प्राणी आणणार
- मुंबईमध्ये सुयोग्य जागी 'लंडन आय'च्या धर्तीवर 'मुंबई आय' उभारणार
- विशेष वातावरणीय बदलासाठी ११३.१८ कोटी
- पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ४००० कोटी रुपयांची तरतूद
- बेस्ट प्रशासनाठी १००० कोटींची तरतूद
- कोळीवाड्यांच्या विकास करण्यासाठी २५ कोटींची तरतूद
- आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी ३०९ कोटींची तरतूद

Web Title: mumbai municipal corporation BMC announces Rs 74427 crore budget for FY 2025 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.