मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली २.३० कोटींची नकली नाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 05:47 IST2025-04-19T05:46:50+5:302025-04-19T05:47:24+5:30

नरेंद्र सोनी यांचे डोंगरीत सराफाचे दुकान आहे. तक्रारीनुसार, रौफ हा त्यांचा ओळखीचा ग्राहक होता.

Mumbai: Man killed by lure of cheap gold; fake coins worth 2.30 crores in hand | मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली २.३० कोटींची नकली नाणी

मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली २.३० कोटींची नकली नाणी

मुंबई : स्वस्त सोने सराफाला महागात पडले. स्वस्त सोन्याच्या नादात सराफाची दोन कोटी ३० लाखांची फसवणूक झाली. भामट्यांनी २५ नकली नाणी सराफाच्या हाती सोपवत पैसे घेऊन पसार झाले. याप्रकरणी  अब्दुल रौफ, पामेश खिमावत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत डोंगरी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. 

नरेंद्र सोनी यांचे डोंगरीत सराफाचे दुकान आहे. तक्रारीनुसार, रौफ हा त्यांचा ओळखीचा ग्राहक होता. १२ एप्रिलला रौफने ओळखीतील पामेश याच्याकडे  वॅलकॅम्बी सुईस या सोने शुद्ध करणाऱ्या परदेशी कंपनीची सोन्याची नाणी आहेत. 

काही अडचणीमुळे ते बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकत असल्याचे सोनी यांना सांगितले. सोनी यांनी नाणी विकत घेण्यास होकार  दिल्यानंतर सोनी यांची पामेशसोबत ओळख करून दिली.सोनी यांनी आधी दहा तोळ्यांची नाणी ६४ लाखांना  घेतली. 

या नाण्यांवर वॅलकॅम्बी सुईस कंपनीचे नाव, बोधचिन्ह होते. त्यामुळे ती खरी असल्याचे सोनी यांना वाटले. त्यानुसार, त्यांनी रौफ, पामेशकडून आणखी १८ नाणी घेतली. १२ एप्रिल ते १४ एप्रिल कालावधीत दोन कोटी ३० लाख आरोपींना त्यांनी दिले.

व्यवहार पूर्ण झाल्यानंतर नाण्यांच्या पिवळ्या रंगावरून सोनीला संशय आला. त्यांनी, आरोपींकडे बिल मागितले. मात्र, त्यांना बिल देण्यास टाळाटाळ केली.  सोनी यांनी नाणी तपासली असता त्यावर सोनेरी वर्ख चढविल्याचे आढळून आले.

Web Title: Mumbai: Man killed by lure of cheap gold; fake coins worth 2.30 crores in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.