Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:58 IST2025-08-21T13:55:37+5:302025-08-21T13:58:01+5:30
Mumbai Latest Crime News: मुंबईतील सांताक्रुझ भागात एका महिलेवर मांत्रिकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
कौटुंबिक आणि आरोग्याच्या समस्येने त्रस्त असलेली महिला एका मांत्रिकाकडे गेली. तिच्या अडचणींचा गैरफायदा घेत मांत्रिकाने तिला पुजा करायला बोलावून घेतलं आणि बलात्कार केला. तुझ्या अंगात भूत आहे आणि ते बाहेर काढतो असे सांगून मांत्रिकाने तिला बोलावलं होतं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईतील सांताक्रुझ भागात ही घटना घडली आहे. सांताक्रुझ पोलिसांनी ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल राशिद असे मांत्रिकाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेचे कुटुंब अडचणींचा सामना करत आहे. त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित समस्यांनाही ती सामोरी जात आहे. कौटुंबिक आणि प्रकृतीच्या समस्येला त्रासालेली महिला आरोपी मांत्रिकाकडे गेली होती.
मांत्रिकाने तिला सांगितले की, तुझ्या अंगात भूत आहे. तुझ्या अंगातील भूत काढायचं असेल, तर आपल्याला पूजा करावी लागेल. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला मांत्रिक राशिदने महिलेला पूजा करण्यासाठी बोलावले.
पूजा करताना बलात्कार
पीडितेने पोलिसांना सांगितले की, मांत्रिक राशिदने पूजा करायला बोलावले होते. पूजेचा विधि करतानाच त्याने अत्याचार केला. सुरूवातीला मला वाटले की, हा भूत काढण्याच्या प्रक्रियेचाच भाग आहे. पण, नंतर लक्षात आलं की, पुजेशी याचा काही संबंध नाही. मांत्रिकाने पुजेच्या नावाखाली फसवणूक बलात्कार केला.
हा प्रकार घडल्यानंतर पीडिता सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गेली. तिने पोलिसांना घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मांत्रिकाविरोधात बीएनएसमधील कलम ६४,६४(२) आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस मांत्रिकाचा शोध घेत आहेत.