Mumbai Teacher Student News: मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षिका असलेल्या महिलेने विद्यार्थ्यालाच वासनेची शिकार बनवलं. शिक्षिकेला अटक केल्यानंतर पोलिसांच्या हाती जी माहिती लागली ती हादरवून टाकणारी आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याला सुरूवातीला दारू पाजली. त्याला एनझायटीच्या गोळ्या दिल्या आणि बळजबरी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वर्षभर असेच सुरू राहिले. सुरूवातीला शिक्षिका विद्यार्थ्याला कारमध्ये घेऊन जायची, कारमध्येच त्याच्यावर बलात्कार करायची... पण, नंतर ती त्याला हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली. शिक्षिकेने वासना शमवण्यासाठी केलेल्या कारनाम्याचा गोष्टी समजल्यावर पोलिसही चक्रावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शिक्षिकेने विद्यार्थ्याचे लैंगिक शोषणच केले नाही, तर शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओ बनवले, फोटो काढले. ती बळजबरीने विद्यार्थ्यासोबत हे सगळं करत होती. त्यामुळे विद्यार्थी नैराश्यात गेला आणि हे सगळं प्रकरण समोर आलं.
शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध, हे प्रकरण सुरू कसं झालं?
२०२४ मध्ये याची सुरूवात झाली. आरोपी शिक्षिका शाळेत इंग्रजी भाषा विषय शिकवायची. ती एका नाटकाचे दिग्दर्शनही करत होती. त्यावेळी पीडित विद्यार्थ्याचे वय १६ वर्ष होते. विद्यार्थ्यानेही नाटकात भाग घेतला होता. तिथूनच शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्यामुळे विद्यार्थी घाबरला आणि शिक्षिकेशी बोलण बंद केलं.
शिक्षिकेच्या मैत्रिणीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी केलं तयार
विद्यार्थ्याने बोलणं बंद केल्यामुळे आरोपी शिक्षिकेने तिच्या मैत्रिणीला हे सांगितलं. शिक्षिकेच्या मैत्रिणीने विद्यार्थ्याला संपर्क केला आणि हल्ली कमी वयात लैंगिक संबंध ठेवणं सामान्य बाब आहे असे सांगितले. त्याचबरोबर शिक्षिकेसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबावही टाकला. शिक्षिकेच्या मैत्रिणीला या प्रकरणात सह आरोपी करण्यात आले असून, ती सध्या फरार आहे.
दरम्यान, घाबरून विद्यार्थी शिक्षिकेला भेटला. शिक्षिका विद्यार्थ्याला फॉक्सवॅगन कारमधून फिरायला घेऊन गेली. निर्जन स्थळी कार नेल्यानंतर शिक्षिकेने त्याच्यावर बलात्कार केला. हे असे अनेकदा झाले.
त्यानंतर शिक्षिका विद्यार्थ्यावर जुहू, विमानतळ परिसर आणि दक्षिण मुंबईतील पंचतारांकित (फाईव्ह स्टार) हॉटेलमध्ये नेऊ लागली आणि त्याला दारू प्यायला देऊन शरीरसंबंध ठेवू लागली. ती विद्यार्थ्याला म्हणायची की, 'आपण एकमेकांसाठी बनलो आहोत आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.'
शिक्षिकेकडून शोषण, विद्यार्थ्याला नैराश्याने ग्रासले
सातत्याने लैंगिक शोषण होत असल्याने विद्यार्थी नैराश्यात गेला. तो गप्प राहायचा. त्याचा वागणुकीत अचानक बदल झाले. तो बोलणं टाळायचा. त्याच्या आईवडिलांना हे बदल विचित्र वाटले. त्यांनी त्याला बोलण्याचा प्रयत्न केला. तो काही बोलेना. त्याने इतकंच सांगितलं की, मी डिप्रेशनमध्ये आहे आणि शिक्षिका मला यातून बाहेर पडण्यासाठी गोळ्या देत आहे.
शिक्षिकेने नोकराला पाठवले विद्यार्थ्याच्या घरी
दरम्यान, लैंगिक शोषणाला कंटाळून विद्यार्थ्याने शिक्षिकेला बोलणं बंद केलं. तिचे कॉल, मेसेज तो टाळू लागला. त्यामुळे शिक्षिका अस्वस्थ झाली. तिने तिच्या नोकराला विद्यार्थ्याच्या घरी पाठवले आणि मला भेट असा निरोप पाठवला. त्यामुळे विद्यार्थी घाबरला आणि त्याने आईवडिलांना शिक्षिकेबद्दल सगळं सांगितलं. त्यानंतर आईवडिलांना पोलिसांना संपर्क केला आणि तक्रार दाखल केली.
पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून शिक्षिकेला अटक केली. या प्रकरणात तिला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणीला सह आरोपी करण्यात आले. तिची मैत्रीण सध्या फरार आहे. पोलिसांनी न्यायालयासमोर शिक्षिकेला हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची कोठडी सुनावली.