Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:11 IST2025-12-20T11:06:29+5:302025-12-20T11:11:19+5:30
Mumbai Rape Crime: मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर ४५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या व्यक्तीने मुलीवर अत्याचार करतानाचे व्हिडीओही बनवले होते.

Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
एका अल्पवीयन मुलीला शीतपेयातून गुंगीचा पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ४५ वर्षीय नराधमाने हे कृत्य केलं असून, त्याने मुलीवर अत्याचार करतानाचा व्हिडीओही बनवला होता. हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी तिला ब्लॅकमेल करत होता. अखेर पीडित मुलीने धाडस केलं आणि अत्याचाराच्या प्रकरणाला वाच्या फुटली. पोलिसांनी तक्रार मिळताच गुन्हा दाखल आरोपीला ६ तासात बेड्या ठोकल्या.
मुंबईतील मालाड पूर्व भागात ही घटना घडली आहे. महेश रमेश पवार (वय ४५ वर्षे) असे या नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला विरारमधून अटक केली. आरोपीने अशा पद्धतीने अनेक मुलींवर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोल्डड्रिंकमधून दिला गुंगीचा पदार्थ
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेश पवार याने मुलीला कोल्डड्रिंकमधून गुंगी येणारा पदार्थ दिला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार करतानाचे व्हिडीओ बनवले आणि ब्लॅकमेल करत होता. याच पद्धतीने त्याने इतर काही मुलींवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.
८ ते १० मुली-महिलांवर अत्याचार केल्याचा संशय
पोलीस अधिकाऱ्याने या आरोपीबद्दल माहिती देताना सांगितले की, तो पीडित मुलींचे, महिलांचे अश्लील व्हिडीओ तयार करायचा. त्यांना सातत्याने ब्लॅकमेल करायचा. पुन्हा त्यांच्यावर अत्याचार करायचा. आरोपीने आतापर्यंत ८ ते १० मुलींसोबत असे केल्याचा संशय आहे. पीडितेकडून तक्रार देण्यात आल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.