मुंबई सेंट्रल - जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 21:50 IST2019-09-11T21:45:20+5:302019-09-11T21:50:27+5:30
अग्निशमन दलाला आग तात्काळ आटोक्यात आणता आली.

मुंबई सेंट्रल - जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग
मुंबई - रेल्वे यार्डामध्ये देखभाल दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या मुंबई सेंट्रल- जयपूर एक्स्प्रेसच्या थ्री टियर एसी डब्याला आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आगीची घटना घडली तेव्हा या डब्यात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे. संध्याकाळी बी-३ डब्याला आग लागली. अग्निशमन दलाला आग तात्काळ आटोक्यात आणता आली. त्यामुळे बाजूचा बी-२ डबा सुरक्षित राहिला. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. ही एक्स्प्रेस ठरलेल्या वेळेनुसार संध्याकाळी ६.५० वाजता सुटणार होती. मात्र, आग लागल्याने ती दोन तास उशीरा सुटण्याचा अंदाज पश्चिम रेल्वेकडून वर्तविण्यात आला होता. एक्स्प्रेस सुटण्याआधी रेल्वे यार्डात देखभालीसाठी येण्यात आली होती.
मुंबई - मुंबई सेंट्रल येथील रेल्वे कारखान्याजवळ उभ्या असलेल्या जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) September 11, 2019