कुर्ल्यात दोन बेस्ट बसमध्ये चिरडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 14:44 IST2018-06-22T14:38:54+5:302018-06-22T14:44:45+5:30

दोन बेस्ट बसमध्ये चिरडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कुर्ला बस डेपोमधील शुक्रवारी (22 जून) सकाळी ही घटना घडली आहे.

mumbai best bus accident kills 22 year old woman at kurla | कुर्ल्यात दोन बेस्ट बसमध्ये चिरडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

कुर्ल्यात दोन बेस्ट बसमध्ये चिरडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई - दोन बेस्ट बसमध्ये चिरडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कुर्ला बस डेपोमधील शुक्रवारी (22 जून) सकाळी ही घटना घडली आहे. डेपोमध्ये दोन बस एकामागोमाग उभ्या होत्या. यावेळी यातील एक बस मागे घेताना टायरखाली चिरडल्याने अमरीन सबा मूर्तिजा शेख या 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  

दोन बसच्या मधल्या जागेतून मूर्तिजा शेख जात होती. यादरम्यान, एका बसचालकानं  रिव्हर्स घेतल्याने ती बसखाली चिरडली गेली.  यानंतर तातडीनं तिला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी, पोलिसांनी बेस्ट बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: mumbai best bus accident kills 22 year old woman at kurla