Mumbai: आप पार्टी चा रात्रभर जागता पहारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 21:05 IST2024-05-19T21:04:13+5:302024-05-19T21:05:07+5:30
Mumbai Lok Sabha Election 2024: मतदानाच्या पूर्व रात्री मतदारांवर दबाव टाकणे किंवा मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे प्रकार होतात. हे प्रकार टाळण्यासाठी 'आम आदमी पार्टी' मुंबईचे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून रात्रभर जागता पहारा देणार असल्याचे आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा यांनी सांगितले.

Mumbai: आप पार्टी चा रात्रभर जागता पहारा
- श्रीकांत जाधव
मुंबई - मतदानाच्या पूर्व रात्री मतदारांवर दबाव टाकणे किंवा मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे प्रकार होतात. हे प्रकार टाळण्यासाठी 'आम आदमी पार्टी' मुंबईचे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून रात्रभर जागता पहारा देणार असल्याचे आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी उद्या सोमवारी मतदान आहे. मात्र, मतदानाच्या पूर्व रात्री अनेक ठिकाणी मतदारांना धमकावणे, विशिष्ठ उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव टाकणे किंवा पैसे देऊन मत विकत घेण्याचे प्रकार होऊ शकतात. त्यासाठी आप कार्यकर्त्यांनी आपल्याजवळील मोबाइल कॅमेरात अशा घटना बंदिस्त करून त्या संबंधित पोलीस ठाणे, निवडणूक अधिकारी यांना पाठवाव्यात अशा सूचनाही आपने दिल्या आहेत.