महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 19:29 IST2025-05-29T19:26:38+5:302025-05-29T19:29:45+5:30

BMC Garbage Truck Hits Bike: मुंबईतील अंधेरी परिसरात महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला.

Mumbai: 35-Year-Old Delivery Boy Dies After Collision With BMC Garbage Truck In Andheri | महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना

महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना

मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी महापालिकेच्या चालकाला अटक करण्यात आली.  

अजीम झमीनुल शेखचा असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो गोरेगाव पश्चिमेतील ग्रीनलँड हायस्कूलसमोरील शहीद भगतसिंग नगर येथील रहिवासी असून  एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, अजीम हा दुचाकीने अंधेरी पश्चिमेतील वेस्टर्नबाउंड येथील वालावलकर गार्डनजवळील मस्जिद अल सलाम चौकासमोरून जात असताना महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात अजीम गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ कूपर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

घटनास्थळी पोहोचल्यानंतर आणि प्राथमिक तपासणी केल्यानंतर पोलिसांनी महापालिकेचा चालक प्रकाश नानकू यादव (वय, ४०) याला अटक केली. बेपर्वाईने गाडी चालवून मृत्यू घडवल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.

Web Title: Mumbai: 35-Year-Old Delivery Boy Dies After Collision With BMC Garbage Truck In Andheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.