मुंबई महापालिकेत मनसेला दोन प्रभाग समितीचे अध्यक्षपद? उद्धवसेनेकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 05:54 IST2026-02-25T05:51:19+5:302026-02-25T05:54:08+5:30

मुंबई : तीनपैकी एकही स्वीकृतपद मनसेसाठी सोडण्यात न आल्याने मनसेची नाराजी दूर करण्यासाठी दोन प्रभाग समिती अध्यक्षपद देण्याबाबत उद्धवसेनेकडून ...

MNS to be given two ward committee chairmanships in Mumbai Municipal Corporation? Efforts to dispel displeasure from Uddhav Sena | मुंबई महापालिकेत मनसेला दोन प्रभाग समितीचे अध्यक्षपद? उद्धवसेनेकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

मुंबई महापालिकेत मनसेला दोन प्रभाग समितीचे अध्यक्षपद? उद्धवसेनेकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

मुंबई : तीनपैकी एकही स्वीकृतपद मनसेसाठी सोडण्यात न आल्याने मनसेची नाराजी दूर करण्यासाठी दोन प्रभाग समिती अध्यक्षपद देण्याबाबत उद्धवसेनेकडून प्रयत्न सुरू झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी २० वर्षांनंतर युतीत निवडणूक लढवली. राज ठाकरे यांचे मतदानाच्या तीन दिवस आधी ११ जानेवारीचे भाषण गाजले. त्यामुळेच उद्धवसेनेचे किमान १२-१५ नगरसेवक अधिक निवडून आल्याची चर्चा होती. 

तर राज ठाकरे यांना या युतीतून काहीच लाभ झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे उद्धवसेनेच्या निवडून आलेल्या जागांच्या गुणसूत्रांनुसार त्यांच्या वाट्याला १० पैकी ३ स्वीकृत नगरसेवकपदे आली. त्यातील एक मनसेसाठी सोडावे, अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आली होती.

मात्र उद्धव ठाकरे यांनी तीनही जागांवर आपलेच उमेदवार दिल्याने मनसेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला. मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी तर ही नाराजी एका 'स्टेटस' संदेशातून व्यक्तही केली.

दोन दिवसांत निर्णय

यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झाला नसून पुढील एक-दोन दिवसांत चर्चा करून अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे, असे मनसेच्या नेत्याने स्पष्ट केले. 

उद्धवसेनेकडून प्रभाग समिती अध्यक्षपद केवळ एक वर्षासाठी देण्यात येणार आहे की पूर्ण पाच वर्षांसाठी, मनसेच्या अध्यक्षाला उद्धवसेनेकडून अपेक्षित पाठिंबा देण्यात येईल का? यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे या नेत्यांकडून सांगण्यात आले.

देशपांडे यांच्या 'स्टेटस'नंतर सूत्रे हलली आणि दोन प्रभाग समिती अध्यक्षपदे मनसेसाठी सोडण्याची चर्चा सुरू झाली. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार गटनेते यशवंत किल्लेदार यांना पक्षाने दिल्याचे सांगण्यात आले.

Web Title : मुंबई में मनसे को मिल सकते हैं दो समिति अध्यक्ष पद: शिवसेना का प्रयास

Web Summary : सीट आवंटन के बाद मनसे को मनाने के लिए, शिवसेना (यूबीटी) दो वार्ड समिति अध्यक्ष पद देने पर विचार कर रही है। अंतिम निर्णय प्रतीक्षित है, समर्थन अवधि पर चर्चा जारी है। मनसे नेता फैसला करेंगे।

Web Title : MNS Likely to Get Two Committee Head Posts in Mumbai

Web Summary : To appease MNS after seat allocation, Shiv Sena (UBT) considers offering two ward committee chairperson posts. Final decision awaited, discussions ongoing regarding support duration. MNS leader to decide.