Join us

"कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 15:31 IST

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : नागरिकांना घाबरवून ठेवायचे काम या सरकारने चांगले केले आहे अशी टीका मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाआघाडी सरकारवर केली आहे.

मुंबई - गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण भारतात कोरोनाने थैमान घातले असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. पण या संपूर्ण काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी लोकांना कोरोनाची लाट येणार आहे आणि नागरिकांना घाबरवून ठेवायचे काम या सरकारने चांगले केले आहे अशी टीका मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाआघाडी सरकारवर केली आहे.

कोरोना काळात सरकारचे व्यवस्थापन एकदमच कोलमडले होते आणि याचाच फटका बेरोजगारी, आर्थिक मंदी, नागरिकांचे नाहक बळी अशा अनेक बाबतीत पडला. म्हणूनच आज आईच्या माध्यमातून या सरकारपर्यंत आवाज पोहचून सक्षम अशी आरोग्य व्यवस्था आणि त्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने व्हावे यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून गाऱ्हाणे मांडत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

आजही कोरोनाची धोका कायम आहे आणि तिसरी लाट येणार असल्याचे सूतोवाच आरोग्यमंत्री करताना दिसतात जसे काही हे भविष्य सांगणारे आहेत. पण यांच्या पक्षाचे मेळावे, बैठका, निवडणूक प्रचार, आंदोलने यासाठी कोरोनाचा विसर मात्र यांना सोयीस्कररित्या पडतो अशी टीका त्यांनी केली.

आई माझी अशी..हाकेला धाव ग..कोरोना कोरोना..झाला बागुलबुवा फार ग..कडक आणि शिथिलचाचालू नुसताच खेळ ग..'न्यू' आयुष्यात काही उरलंच नाही 'नॉर्मल' तरी सगळं कर ग.."अशा काव्यपंक्ती सादर करत त्यांनी देवीला गाऱ्हाणे घातले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमनसेनवरात्री