मतांसाठी मनसेचे मतपरिवर्तन, उत्तर भारतीयांचा आला कळवळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 05:07 AM2018-11-13T05:07:20+5:302018-11-13T05:08:00+5:30

छटपूजेला पाठिंबा : उत्तर भारतीयांचा आला कळवळा

MNS 'mutation for votes, North Indians get pity | मतांसाठी मनसेचे मतपरिवर्तन, उत्तर भारतीयांचा आला कळवळा

मतांसाठी मनसेचे मतपरिवर्तन, उत्तर भारतीयांचा आला कळवळा

Next

नारायण जाधव 

ठाणे : एकेकाळी मराठी माणूस डोळ्यांसमोर ठेवून आपली मुहूर्तमेढ रोवून राज्यात परप्रांतीयांविरोधात रान पेटवणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आता मतांच्या बेगमीसाठी मतपरिवर्तन झालेले दिसत आहे. यामुळेच काही उत्तर भारतीयांना मारहाण करून त्यांच्या छटपूजेला विरोध करणाºया या पक्षाने ठाण्यात यंदा छटपूजेला कृत्रिम तलावासह इतर सुविधा देण्याची मागणी केली आहे. तिकडे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनीही उत्तर भारतीयांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमास हजेरी लावण्याचे मान्य केले आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांत केवळ मराठी मतेच नव्हे, तर उत्तर भारतीय मतेही तितकीच महत्त्वाची आहेत, हे लक्षात घेऊन हे परिवर्तन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकर अंतर्गत मुंबईत जो जो राहतो तो तो आपला, हे गृहीत धरून चळवळ उभी केली होती. तिला मिळणारा प्रतिसाद पाहता लगेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या इशाºयावरून पक्षाच्या कार्यकर्त्यांनाी रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना कल्याण रेल्वेस्थानकात बेदम मारहाण केली होती. नंतर, हे लोण राज्यभर पसरले होते. याचा परिपाक म्हणून पक्षाला कल्याण-डोंबिवली आणि नाशिक महापालिका निवडणुकांत २००९ मध्ये अभूतपूर्व यश मिळाले होते. विधानसभेतही १३ आमदार गेले होते. नंतर, मात्र परप्रांतीयांनी मनसेविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. तसेच मराठी मतांचेही विभाजन होऊन २०१४ पासून मनसेला राज्यात उतरती कळा लागली. २०१९ मधील चूक सुधारण्यासाठी मनसेने उत्तर भारतीयांना चुचकारणे सुरू केले आहे. उत्तर भारतीय महापंचायतने आयोजित केलेल्या कांदिवलीतील कार्यक्रमाला राज ठाकरे २ डिसेंबर रोजी जाणार आहेत. पक्षाचे मुंबईचे नेते संदीप देशपांडे हे सुद्धा हजर राहणार आहेत.

उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा
कष्टकरी उत्तर भारतीय समाज हा प्रामुख्याने मुंबईच्या झोपडपट्टी विभागात मोठ्या संख्येने राहतो. तोच मतदानासाठी बाहेर पडतो. यामुळे त्यांना आपलेसे करण्यासाठी राज हे प्रथमच त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तसे राज ठाकरे यांच्याविषयी उत्तर भारतीय समाजाला मोठे आकर्षण आहेच.
 

Web Title: MNS 'mutation for votes, North Indians get pity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.