'खोड्या काढल्याशिवाय सिद्धार्थला स्वस्थ वाटायचं नाही'; मनसेच्या नेत्यानं जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 12:39 PM2021-09-03T12:39:52+5:302021-09-03T12:40:47+5:30

मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनाही सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली आहे.

MNS general secretary KirtiKumar Shinde has also paid homage to actor Siddharth Shukla. | 'खोड्या काढल्याशिवाय सिद्धार्थला स्वस्थ वाटायचं नाही'; मनसेच्या नेत्यानं जागवल्या आठवणी

'खोड्या काढल्याशिवाय सिद्धार्थला स्वस्थ वाटायचं नाही'; मनसेच्या नेत्यानं जागवल्या आठवणी

Next

मुंबई : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला असून, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक जण समाजमाध्यमांवर पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत.

मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनाही सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे. सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर कीर्तीकुमार यांनी त्याच्यासोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सिद्धार्थ आमच्यासाठी कायम मॉन्टीच होता. आम्ही त्याल मॉन्टी किंवा मोन्टू म्हणायचो. तो प्रकाशझोतात आल्यानंतर त्याचं नाव सिद्धार्थ असल्याचं समजलं. तोपर्यंत तो आमच्यासाठी मॉन्टीच होता, असं कीर्तीकुमार शिंदे यांनी फुसबुकच्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 

दरम्यान, सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कूपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सिद्धार्थच्या निधनाची वार्ता ऐकून बॉलिवूडमधील अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.

कारकीर्द

१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८ मध्ये त्याने ‘बाबुल का आंगन छूटे’ या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती.

Web Title: MNS general secretary KirtiKumar Shinde has also paid homage to actor Siddharth Shukla.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.