"हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले, तसेच..."; मनसेची विठ्ठल चरणी प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 12:57 PM2021-07-20T12:57:57+5:302021-07-20T12:59:29+5:30

आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक स्वतः गाडी चालवत पंढरपूरला पोहोचले आहेत.

MNS comment over Chief Minister Pandharpur visit | "हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले, तसेच..."; मनसेची विठ्ठल चरणी प्रार्थना

"हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले, तसेच..."; मनसेची विठ्ठल चरणी प्रार्थना

Next

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पंढरपूर दौऱ्यावर जोरदार निशाणा साधत, विठ्ठलाकडेही खास प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना, "आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले, तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयातसुद्धा जाऊदे," अशी प्रार्थना संदीप देशपांडे यांनी विठ्ठलाकडे किली आहे. (MNS comment over Chief Minister Pandharpur visit)

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, ”हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयातसुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेची पण भेट  घेऊदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग... पांडुरंग..”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विठूरायासमोर नतमस्तक; विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

स्वतः ड्रायव्हिंग करत पंढरपुरात पोहोचले मुख्यमंत्री -
आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक स्वतः गाडी चालवत पंढरपूरला पोहोचले. काल रात्री 9 वाजताच्या सुमारास ते पंढरपुरात दाखल झाले. गेल्या वर्षीही मुख्यमंत्री ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपूरला गेले होते. त्यावेळी त्यांनी मर्सिडिजने पंढरपूर गाठले होते. मात्र यावेळी त्यांनी रेंज रोव्हर नेली. खरे तर ही गाडी आदित्य ठाकरे वापरतात. पण पावसाचा धोका, तुंबलेले पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून ते या गाडीने गेले आहेत.

शासकीय महापूजा - 
पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तीमय वातावरणात पार पडली. पहाटे सव्वा दोन वाजल्यापासून या महापुजेला सुरुवात झाली होती. दरवेळी मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला या महापूजेचा मान मिळतो. मात्र यंदा वारीच नसल्याने हा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे वर्धा येथील केशव शिवदास कोलते यांना मिळाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे यांच्या समवेत वर्धा येथील केशव शिवदास कोलते व त्यांची पत्नी इंदूबाई केशव कोलते यांना यंदा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला. 

Ashadhi Ekadashi : आषाढीदिनी पंतप्रधान मोदींची विठ्ठल चरणी प्रार्थना, सांगितली वारी चळवळीची महानता

 

Web Title: MNS comment over Chief Minister Pandharpur visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.