उत्तर पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांच्या प्रचारात उतरली मनसे
By मनोहर कुंभेजकर | Updated: May 12, 2024 17:49 IST2024-05-12T17:48:35+5:302024-05-12T17:49:08+5:30
गोरेगाव पश्चिम येथील वायकर यांच्या प्रचार फेरीत मनसे विभाग अध्यक्ष विरेंद्र जाधव व मनसैनिक सहभागी झाले होते.

उत्तर पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांच्या प्रचारात उतरली मनसे
मुंबई - मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आधी उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा प्रचार करणार नाही असा पवित्रा घेतला होता.मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहिर केल्यावर या मतदार संघात मनसे आता वायकर यांच्या प्रचारात सक्रीय झाल्याचे चित्र आहे.स्वतः शालिनी ठाकरे या वायकर यांच्या प्रचार फेरीत,जाहिर सभांमध्ये सक्रीय पणे सहभागी झाल्याचे चित्र आहे.
गोरेगाव पश्चिम येथील वायकर यांच्या प्रचार फेरीत मनसे विभाग अध्यक्ष विरेंद्र जाधव व मनसैनिक सहभागी झाले होते. एकदा राज ठाकरे यांनी आदेश दिल्यावर गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे मनसे सैनिक प्रचारात उतरले असल्याची माहिती त्यांनी दिली. गोरेगाव रेल्वे स्टेशन मार्गे बेस्ट नगर येथे उमेदवार वायकर यांच्या रॅलीत मनसेचा झेंडा फडकवला.यावेळी येथील मनसेचे महिला पुरुष पदाधिकारी,मनसैनिक उपस्थित होते.