Join us  

"राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार पुन्हा पक्षात येण्यास आतुर; लवकरच निर्णय घेणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:04 PM

गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे

नवाब मलिक ट्विट करत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच यावर लवकरच निर्णय घेऊन सार्वजनिक जाहीर केले जाईल, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच काही आमदार शरद पवारांना, दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण, सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. त्याचप्रमाणे राज्यात नोव्हेंबरमध्ये भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. 

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले नेते-

उदयनराजे भोसले - साताराशिवेंद्रराजे भोसले - साताराराणजगजितसिंह पाटील - उस्मानाबादधनंजय महाडिक - कोल्हापूरबबनराव पाचपुते - श्रीगोंदारणजितसिंह मोहिते-पाटील - माळशिरसमधुकर पिचड - अकोलेगणेश नाईक - नवी मुंबई

अन्य महत्वाच्या बातम्या...

राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

Gold Rates Today: सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ; झटपट जाणून घ्या आजचा दर

24 तासांत 1007; देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबळी

पाकिस्तानला सौदी अरेबियाचा दणका; कच्च्या तेलाचा पुरवठाच तोडला

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न थांबविण्यासाठी जेव्हा थेट आयर्लंडच्या फेसबुकमधून फोन आला...

संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली नाहीत; मामाचा खुलासा

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

टॅग्स :नवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार