'कुणीही अडवण्याचं कारण नाही'; उद्धव ठाकरेंना शहाजीबापू पाटलांनी दिलं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:10 PM2022-07-26T19:10:53+5:302022-07-26T19:11:07+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विधानावरुन आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

MLA Shahajibapu Patil has also reacted to Shiv Sena chief Uddhav Thackeray's statement. | 'कुणीही अडवण्याचं कारण नाही'; उद्धव ठाकरेंना शहाजीबापू पाटलांनी दिलं प्रत्युत्तर

'कुणीही अडवण्याचं कारण नाही'; उद्धव ठाकरेंना शहाजीबापू पाटलांनी दिलं प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई- महाराष्ट्र किती सुंदर आहे. ग्रामीण भागातील आमदारांना महाराष्ट्राच्या या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते. पण मला एक कळलंच नाही मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात? असा खोचक सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना विचारला आहे. ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही. प्रेम नाही. त्या मातीचं वैभव दिसलं नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 

बंडखोरांना बाळासाहेब ठाकरे हवे आहेत. त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. माझं आव्हान आहे की, हे नातं तोडून दाखवा. माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. माझे वडील का चोरताय?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी आजच्या सामनाच्या मुलाखतीत विचारला. 

उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन शहाजीबापू पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचं नाही, तर देशाचं नेतृत्व आहेत. या देशातल्या कुठल्याही नागरिकाला बाळासाहेबांचं नाव घेऊन जय-जयकार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणीही नाव घेण्यापासून अडवण्याचं कारण नाही, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, मी स्वत: कलाकार आहे. त्याच्यावरूनही त्यावेळी चेष्टा झाली होती. पण मी गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे. पंढरपूरच्या वारीची केली आहे. त्यावेळी मी जो महाराष्ट्र बघितला. त्यावेळी पावसाच्या सुमारास ही फोटोग्राफी केली. इतका नटलेला, थटलेला महाराष्ट्र, दऱ्याखोऱ्या छान फुलांची बहरून जातात. मी तर शहरी बाबू. तुम्ही तर ग्रामीण भागातले. त्या ग्रामीण भागात राहून तुम्हाला महाराष्ट्राचं सौदर्यं दिसलं नाही. त्याचं वर्णन करावंसं कधी वाटलं नाही आणि डायरेक्ट गुवाहाटी? मी गुवाहाटीला वाईट म्हणत नाही. प्रत्येक प्रदेश चांगलाच असतो पण हे काय आपल्या मातीसाठी करणार? असा सवाल त्यांनी केला. 

मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना....

सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही. पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार? तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: MLA Shahajibapu Patil has also reacted to Shiv Sena chief Uddhav Thackeray's statement.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.