Join us

'महाराष्ट्रात ५० वर्षात शरद पवारांचं मोठं काम...', अमित शहांच्या टीकेला जयंत पाटलांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 10:02 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून काल त्यांनी जळगावात सभा घेतली. या सभेत त्यांनी खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

Jayant Patil ( Marathi News ) :  मुंबई-  लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे, भाजपचीही जोरदार तयारी सुरू असून भाजपमधील दिग्गज नेत्यांनी दौरे सुरू केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून काल त्यांनी जळगावात सभा घेतली. या सभेत त्यांनी खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.  "शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय", अशी टीका त्यांनी केली, या टीकेला 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार'पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

महायुतीत जागावाटपाचा गुंता सुटला? अमित शहांची मध्यरात्री मुंबईत बैठक, भाजपची महाराष्ट्रातील यादी येणार

"५० वर्ष महाराष्ट्राला शरद पवार यांचे एक स्वप्न, एक तरुण शुन्यातून जग निर्माण करणारा ते इथंपर्यंतचा प्रवास महाराष्ट्राने त्यांचा बघितला. महाराष्ट्राने त्यांना साथ दिली. सहन करण्याचा कधीच प्रश्न उद्भवला नाही, त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्मांना बरोबर घेऊन राजकारण केले म्हणून त्यांना आज शरद पवार म्हणतात, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्या टीकेला दिले. 

"महाराष्ट्रातील आज सर्व मान्यता आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून मानतात त्यांना पाठिंबा देतात. आजही ते सर्वांना हवेहवेसे वाटतात, असंही जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रात सर्वात मोठी ताकत शरद पवारांची आहे, प्रतिमा मोठी आहे, महाराष्ट्र त्यांनाच मानतो त्यामुळे अशा गोष्टी होणे स्वभाविक आहे, 'शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना केलेले काम, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचे काम तसेच किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतरचे काम महाराष्ट्र विसरलेला नाही, असंही पाटील म्हणाले. 

अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केली टीका

उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जी भाच्याचे, तर स्टॅलिन मुलाचे भवितव्य शोधण्यात व्यस्त आहेत. शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत. नरेंद्र मोदी मात्र विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यात व्यस्त आहेत, असा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील सभेत विरोधकांचा समाचार घेतला.

टॅग्स :जयंत पाटीलभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसअमित शाहशरद पवार