मुंबई : मालाड पश्चिमच्या मदरशात झालेल्या १० वर्षीय मुलाच्या आत्महत्येप्रकरणी मालवणी पोलिस सध्या सखोल चौकशी करत आहेत. या मुलाचा मृत्यू हा गळफासाने झाल्याचे उघड झाले असले तरी त्याने हे पाऊल का उचलले, याची चौकशी आम्ही करत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
मालवणीच्या मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह मदरशाच्याच स्वयंपाकघरामध्ये आढळला होता. एका कपड्याने त्याने छताच्या सिलिंगला लटकून आयुष्य संपवले. मालवणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी त्यांना कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही. मुलाच्या शवविच्छेदन अहवालातदेखील त्याचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले. त्याचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्या खोलीला आतून कडी होती, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
मित्रांकडे चाैकशीnमात्र, त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत आम्ही सध्या चौकशी करत आहोत.nआम्ही त्याच्या नातेवाइकांसह, शेजारी तसेच त्याच्या मित्रांकडेही याप्रकरणी चौकशी करत आहोत, असेही पोलिसांनी सांगितले.