Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 18:25 IST

१७ हजार ४३०.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

मुंबई : म्हाडाच्या २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या मंडळांमार्फत एकूण १३ हजार १२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून, अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी १०५८५.१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या योजनांमुळे राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होईल, असा दावा म्हाडाने केला आहे.

१) २०२५-२६ वर्षाकरिता सुधारित व २०२६-२०२७ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास सादर करण्यात आला.२) २०२५-२०२६ वर्षाकरिता १२३९९.२२ कोटी रुपयांच्या सुधारित व २०२६-२७ च्या १७४३०.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची मंजुरी मिळाली. 

कुठे किती घरे बांधली जाणार आणि किती कोटी रुपयांची तरतूद

ठिकाण / घरे / बांधकाम खर्चासाठी किती कोटींची तरतूद मुंबई / २५३८ / ६७४७.४२ कोकण / ५११२ / १४९७.६४ पुणे / ६६५ / ६६४.०० नागपूर / २००८ / १२०६.१९ छत्रपती संभाजीनगर / १४८३ / २५८.३२ नाशिक  / २३७ / १५१.५७ अमरावती / ९६९ / ५९.९८ 

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे आमदार निधी /शासन निधीतुन करण्यात येणा-या कामांसाठी अर्थसंकल्पात २७११.९५ कोटी रुपयांची तरतूद आहे. थर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाअंतर्गत उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी तसेच पीएमजीपी, संक्रमण गाळे व पुनर्रचित इमारतींच्या दुरुस्ती व देखभाल करिता अर्थसंकल्पात ६६१.७३ कोटी रुपयांची तरतूद आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MHADA to Build 13,012 Homes in Maharashtra, 2538 in Mumbai.

Web Summary : MHADA plans to construct 13,012 affordable homes across Maharashtra, with 2538 in Mumbai. The budget allocates ₹10585.12 crore for construction, aiming to ease housing accessibility statewide. Mumbai slum improvements get ₹2711.95 crore, building repairs ₹661.73 crore.
टॅग्स :म्हाडा लॉटरीमुंबईपुणेछत्रपती संभाजीनगरनाशिकनागपूरअमरावती