हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:06 IST2021-09-25T04:06:22+5:302021-09-25T04:06:22+5:30

मुंबई : विविध देखभालीच्या कामांसाठी हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी रविवारी ...

Megablock tomorrow on Harbor Road | हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : विविध देखभालीच्या कामांसाठी हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी रविवारी सकाळी ८.०० ते ६.०० दरम्यान कळवा -मुंब्रा अप धीम्या मार्गादरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक आधीच जाहीर करण्यात आला आहे.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे/गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

Web Title: Megablock tomorrow on Harbor Road