‘महापौरपदी महायुतीचा मराठी माणूस’; मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 08:10 IST2026-01-22T08:10:06+5:302026-01-22T08:10:54+5:30
‘संदेसे वीरों को’ या पोस्टकार्ड कॅम्पेनच्या प्रारंभ कार्यक्रमाला लावली हजेरी

‘महापौरपदी महायुतीचा मराठी माणूस’; मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुतीचा, मराठी माणूसच मुंबईच्या महापौर पदावर विराजमान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. जीपीओ येथे पोस्टमन व पोस्ट वूमन यांना ई-बाईक वितरणाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ‘संदेसे वीरों को’ या पोस्टकार्ड कॅम्पेनला प्रारंभ करण्यात आला. फडणवीस यांनी यावेळी लष्करातील जवानांसाठी पत्र लिहिले.
अमृता फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. इंडिया पोस्टच्या या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कार्यक्षम तसेच पर्यावरणाला अनुकूल सेवा देणे शक्य होणार असून, देशातील सर्वात जुनी व विश्वासार्ह संस्था म्हणून असलेली प्रतिमा अधिक बळकट होईल, असे त्यांनी नमूद केले.
मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांनी पार्सल वितरणात मोठी वाढ होत असल्याने ई-बाईक सेवेचा मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मनोज कुमार, सिमरन कौर, रेखा रिझवी हे टपाल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व मधु रंगनाथन उपस्थित होते. डाॅ. मृण्मयी भजक यांनी
सूत्रसंचालन केले.