मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:26 IST2025-09-01T12:23:12+5:302025-09-01T12:26:11+5:30

CM Devendra Fadnavis Meeting News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक होत आहे.

manoj jarange patil protest for maratha reservation in mumbai the meeting at cm devendra fadnavis varsha residence deputy cm eknath shinde and ajit pawar also present | मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग

मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग

CM Devendra Fadnavis Meeting News: मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू असताना त्यांच्या मागण्यांवर सरकार पातळीवर बैठकांचा जोर दिसून आला. मात्र, सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. 'बैठकांना जोर, चर्चेला मात्र ब्रेक' असे चित्र होते. दुसरीकडे आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देत आपण सोमवारपासून पाणीही पिणार नाही, असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यातच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. 

मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जमले आहेत. सीएसएमटी स्थानक परिसर, मंत्रालयासह अनेक भागांत मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर हजारो चाकरमानी मुंबईत आपापल्या कामावर परतत आहेत. यामुळे गर्दीत भर पडत असून, अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक होत आहे. 

उपमुख्यमंत्री शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री, नेते या बैठकीत उपस्थित आहेत. तत्पूर्वी, मंत्रिमंडळ उपसमितीची अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला सदस्य मंत्र्यांची उपस्थिती होती. अॅडव्होकेट जनरल बीरेंद्र सराफ यांच्याशी दीड तास चर्चा केली. दिवसभराच्या घटनाक्रमाची माहिती विखे पाटील यांनी फोनवरून मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. जरांगे पाटील यांनी मराठा अभ्यासकांसमवेत आझाद मैदानावरील उपोषणस्थळी दीड तास चर्चा केली. जरांगे पाटील यांची उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तब्येत खालावल्याने डॉ. कोरडेंनी त्यांची तपासणी केली.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन घ्या, असे कोणी म्हणत असेल आणि त्यावर सरकारने केवळ अशांना खूश करण्यासाठी निर्णय घेतलाही तरी तो एक दिवसही टिकणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. न्यायालयाच्या आधीच्या निर्णयांचाही विचार करावा लागेल. कोणाला खूश करायचे म्हणून सरकारने निर्णय घेतला अन् तो टिकला नाही तर मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना तयार होईल. म्हणून आम्ही चर्चा करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

Web Title: manoj jarange patil protest for maratha reservation in mumbai the meeting at cm devendra fadnavis varsha residence deputy cm eknath shinde and ajit pawar also present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.