Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:18 IST2025-07-10T12:09:59+5:302025-07-10T12:18:52+5:30

Sanjay Raut : मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

maharashtra politics Will Thackeray brothers contest the municipal elections together? Sanjay Raut made it clear | Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये मराठी मुद्द्यावरुन राजकारण तापले आहे. पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा पाहायला मिळाल्या. आता हे दोन्ही बंधू मुंबई  महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आज खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणुका लढण्यासाठी लोकांचा दबाव असल्याचे सांगितले. 

अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?

 आज खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले, इंडिया आघाडी विषय हा राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी, लोकसभा, राज्यसभा या संदर्भात आहे. महाविकास आघाडी स्थापन झाली. त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते. शिवसेना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली आघाडी आम्ही एकत्र निवडणुका लढलो. आम्ही महाविकास आघाडीतून कोणीही बाहेर पडलेलो नाही, आम्ही त्याचे घटक आहोत. आजही महाविकास आघाडी संदर्भात निर्णय एकत्र घेतले जातील, असंही संजय राऊत म्हणाले.

एकत्र निवडणुका लढाव्या हा लोकांचा दबाव...

"आता विषय राहतो महानगरपालिकांचा, त्यासंदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी या स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढतील काय? त्यासाठी त्यांची स्थापना नाही, स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणे असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावे लागते. कधी स्थानिक आघाडी करावी लागते. मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकच सांगितले आमच्या सगळ्यांवर जनतेचा दबाव आहे, जो आपण पाच तारखेला पाहिला असेल, मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि मनसे खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या हा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, त्यावरती फार चिंता करण्याचे काही कारण नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

Web Title: maharashtra politics Will Thackeray brothers contest the municipal elections together? Sanjay Raut made it clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.