Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंवरुन कुणाल कामराचं नवीन गाणं; संजय राऊतांनी ट्विट केलं, उदय सामंत म्हणाले, 'खपवून घेणार नाही'
By संतोष कनमुसे | Updated: March 23, 2025 23:11 IST2025-03-23T23:05:51+5:302025-03-23T23:11:36+5:30
Maharashtra Politics : खासदार संजय राऊत यांनी कुनाल कामरा याचे एक गाणं ट्विट केले आहे.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंवरुन कुणाल कामराचं नवीन गाणं; संजय राऊतांनी ट्विट केलं, उदय सामंत म्हणाले, 'खपवून घेणार नाही'
Maharashtra Politics ( Marathi News ) : कुणाल कामरा याने कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक नवीन गाणं म्हटले आहे. हे गाण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. कुणाल कामरा याने या गाण्यातून एकनाथ शिंदे यांना राजकीय टोले लगावले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे गाणं ट्विट केले आहे. या पोस्टच्या 'कुनाल की कमाल! जय महाराष्ट्र!', अशी कॅप्शन दिली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी सावंत म्हणाले, कुणाल कामराच्या गाण्यावर आताच आम्ही चर्चा केली. ते पूर्ण गाण ऐकून आम्ही त्यावर एफआयआर दाखल करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर जर कोणी बदनामीकारक गाण तयार करायला लागलं तर आम्ही काही शांत बसणार नाही, त्यावरती आम्ही कारवाई करणार, असंही उदय सामंत म्हणाले.
कुनाल की कमाल!
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 23, 2025
जय महाराष्ट्र! https://t.co/U4Jxdo4dCm
संजय राऊतांनी केलेल्या ट्विटवर बोलताना सामंत म्हणाले, त्यांनी काय ट्विट केले . हे पाहण्यापेक्षा आमची भूमिका काय हे पाहणे महत्वाचे आहे. एखाद्याची बदनामी करायला एखाद्याला आनंद वाटतो, पण आम्ही ती भावना नाही, ते संस्कार आमचे नाहीत, असंही सामंत म्हणाले.
कार्यकर्त्यांचे शिबीर घेणार
"एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामुळे आम्ही सगळे आहोत. शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचा कार्यकर्त्यावर असणारा आशीर्वाद हेच मोठे पद आहे. एकनाथ शिंदे यांनी जे निर्णय घेतले आहेत, त्या सर्व कार्यकर्त्यांना माहित पाहिजेत. त्यासाठी आमचं शिवसेनेचं मुंबईत प्रशिक्षण शिबीराच आयोजन केले आहे, असंही उदय सामंत म्हणाले.