राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठेयत? शरद पवारांच्या उत्तरानंतर पाटलांचे लगेचच ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 17:55 IST2023-07-02T17:53:53+5:302023-07-02T17:55:27+5:30
जयंत पाटील यांनी दोनच शब्दात भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठेयत? शरद पवारांच्या उत्तरानंतर पाटलांचे लगेचच ट्विट
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर छगन भुजबळ यांनीही शपथ घेतली. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, खासदार शरद पवार यांनी यावर प्रतिक्रीया देत आपला याला पाठिंबा नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संरर्भातही प्रतिक्रीया दिली.
'तटकरे, पटेल यांच्यावर कारवाई करावी लागेल'; शरद पवारांनी दिला इशारा
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठे आहेत असा प्रश्न करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी पाटील पक्ष कार्यालयात सकाळपासून असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी उत्तर देताच काहीवेळातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जयंत पाटील यांनी फक्त दोनच शब्दाचे ट्विट केले आहे. 'मी साहेबांबरोबर... असं ट्विट पाटील यांनी केले आहे. या ट्विटमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बाजूल शरद पवार बसल्याचे दिसत आहे. दरम्यान, या ट्विटला अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.
मी साहेबांबरोबर... pic.twitter.com/npZZVEvKk2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 2, 2023
शरद पवारांनी दिला इशारा
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे, दरम्यान या सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात होते, आता शरद पवार यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. खासदार सुनिल तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई कारवाई करावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला.
शरद पवार म्हणाले, पक्षाच्या धोरणाशी विसंगत पाऊले कोणी टाकली असतील तर त्याचा निर्णय पक्षाचे लोक बसून घेतली. जयंत पाटील आदींशी चर्चा करावी लागेल. एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. काहींची पदाधिकारी यांची नेमणूक मी केलेली आहे. जनरल सेक्रेटरी म्हणून सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक मी केलेली आहे. त्यांनी पक्षाच्या भल्यासाठी पाऊले टाकलेली नाहीत. त्यांनी जबाबदारी पार पाडलेली नाही. यामुळे त्यांच्यावरील पुढील कारवाई मला करावी लागेल, असा सूचक इशारा शरद पवार यांनी दिला.