Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 10:02 AM2024-06-05T10:02:23+5:302024-06-05T10:16:24+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अमोल कीर्तिकर यांनी बाद झालेल्या १११ टपाली मतदानावर आक्षेप घेऊन त्याची फेरतपासणी करण्याची मागणी केली. यानंतर आता संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut reaction over Amol Kirtikar lost | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे"

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे"

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राज्यातील काही मतदारसंघांत उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढवणारे निकाल पाहायला मिळाले. यात सर्वात चुरशीचा आणि काळजाचा ठोका चुकवणारा निकाल ठरला तो मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील. या मतदारसंघात दिवसभरात कधी रवींद्र वायकर (Ravindra Waikar) आघाडीवर, तर कधी अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) आघाडीवर असे चित्र होते. सायंकाळी शिवसेना नेत्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर येऊन अमोल यांचा २२०० मतांनी विजय झाल्याचे घोषित केले. याला विरोधी उमेदवार वायकर यांनी आक्षेप घेतला आणि फेर मतमोजणीची मागणी केली. त्यानंतर पुन्हा मतमोजणी पार पाडली.

या मतमोजणीत वायकर यांना अवघ्या ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यावर अमोल कीर्तिकर यांनी बाद झालेल्या १११ टपाली मतदानावर आक्षेप घेऊन त्याची फेरतपासणी करण्याची मागणी केली. यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत तर ती जागा चोरलेली आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 
 
"निवडणुकीत जे यश मिळालं त्यासाठी जनता शिल्पकार आहे. अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत तर ती जागा चोरलेली आहे. आपल्या हातात सत्ता आहे, आपण अधिकाऱ्यांना दमदाटी करू शकता. माणसं विकत घेऊ शकतात. त्या ताकदीवर अशा चोऱ्यामाऱ्या या देशभरात झाल्या आहेत. याक्षणी बिहारला अशा चोऱ्यामाऱ्या सुरू आहेत."

"मुंबईतही चोरी झाली. अशा अनेक ठिकाणी गोष्टी झाल्या, नाहीतर ३० ते ३५ हा जो आकडा आम्ही देत होतो तो आम्ही गाठला असता. पण काही चोऱ्या होतील हे आम्ही गृहीत धरून हा आकडा सांगितला होता. हे महाविकास आघाडीचं यश आहे. तीन पक्ष एकत्र राहिले त्यामुळे एका जिद्दीने प्रत्येक ठिकाणी एकत्रित काम केलं त्याचं हा परिणाम आहे" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut reaction over Amol Kirtikar lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.