Maharashtra Lockdown : आता निर्णय घेण्याची वेळ, कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 18:03 IST2021-04-10T18:02:34+5:302021-04-10T18:03:13+5:30
Maharashtra Lockdown : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नसल्यानं राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Maharashtra Lockdown : आता निर्णय घेण्याची वेळ, कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Maharashtra Lockdown : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नसल्यानं राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील कोरोना स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं जाण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Govt Complete Lockdown In The State Once Again Hints CM Uddhav Thackeray)
सर्वपक्षीय बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत.
कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. सध्या कोरोनाची साखळी तोडणं गरजेचं आहे आणि लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कळत नकळत कोरोनाचा प्रसार होतोय आणि हे सर्वात घातक आहे. राज्यात तरुण पिढीलाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होतेय. कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर परिस्थिती गंभीर होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.
लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असंही मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.