Join us

Maharashtra Government:'भाजपा नं. १... आमच्याशिवाय सरकार बनू शकणार नाही'; चंद्रकांतदादांचाही इरादा पक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 17:02 IST

Maharashtra News : राज्यात भाजपाच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा पुनरुच्चार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केल्यास सहा महिने देखील त्यांचे सरकार टिकणार नाही. तसेच राज्यात भाजपाचेच सरकार स्थापन होईल अस वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यातच राज्यात भाजपाच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा पुनरुच्चार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजपाने 2014 आणि 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. तसेच इतर पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा कोणत्याही राजकीय पक्षाला निवडून आणत्या आल्या नाही. त्यामुळे राज्यात सर्वाधित मत भाजपा पक्षाला मिळाले असून दोन नंबरची मत शिवसेनेला मिळाली आहेत. भाजपाकडे 119 आमदारांच पाठबळ असल्याने भाजपा पक्षाशिवाय राज्यात सरकार स्थापन करणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाने या बैठकीत निवडणुकामधील विजयी जागा व पराभूत जागा यावर चर्चा झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

याआधी देखील राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केल्यास सहा महिने देखील त्यांचे सरकार टिकणार नाही. त्यामुळे पुन्हा भाजपाचेच सरकार येईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणिराष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार की नाही याचे उत्तर आगामी काही दिवसात मिळणार आहे.

टॅग्स :चंद्रकांत पाटीलभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019महाराष्ट्र सरकार