Join us  

Maharashtra Government: महाविकासआघाडीला पी. चिदंबरम यांनी दिला 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 4:02 PM

Maharashtra News: 'महाविकासआघाडी'चे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला होता. शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे म्हणजेच 'महाविकासआघाडी'चे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. महाविकासआघाडीने स्वत:चे वैयक्तिक हित बाजूला ठेवून ठरल्याप्रमाणे किमान समान कार्यक्रमावर सरकार चालवण्याचा सल्ला काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी महाविकासआघाडीला दिला आहे.

पी. चिदंबरम ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्रात राज्यपालांनी पहाटे चार वाजता राष्ट्रपती राजवट हटविण्याचा निर्णय घेतला. राज्यपालांचा हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रोजगार, सामाजिक न्याय, शेतकऱ्यांचे प्रश्नांवर अधिक लक्ष द्यावे असं देखील चिदंबरम यांनी सांगितले आहे.

आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी दिल्लीच्या न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. ७४ वर्षीय चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली व सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ते ईडीच्या कोठडीत आहेत. 

टॅग्स :पी. चिदंबरमउद्धव ठाकरेशिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसआयएनएक्स मीडियामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019