Maharashtra Government: 'महाशिवआघाडी'वर अमोल कोल्हेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 17:29 IST2019-11-15T17:15:05+5:302019-11-15T17:29:03+5:30
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे.

Maharashtra Government: 'महाशिवआघाडी'वर अमोल कोल्हेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मुंबई: महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार की नाही याचे उत्तर आगामी काही दिवसात मिळणार आहे. मात्र शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादीत गेलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना महाशिवआघाडी बद्दल प्रश्न विचारल्यास महाशिवआघाडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्यावर चर्चा करु अस मत त्यांनी व्यक्त केले आहे.
''मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात आहे"
अमोल कोल्हे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार येणार की दूसर कोणाचं सरकार येणार याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारचं उत्तर देऊ शकतात असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.
'भाजपा नं. १... आमच्याशिवाय सरकार बनू शकणार नाही'; चंद्रकांतदादांचाही इरादा पक्का
दरम्यान महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणिराष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार की नाही याचे उत्तर आगामी काही दिवसात मिळणार आहे.
क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो पण राजकारणात नाही; थोरातांचा गडकरींना टोला @bb_thorat@INCMaharashtra@nitin_gadkari#MaharashtraPoliticshttps://t.co/LlGxENi78K
— Lokmat (@MiLOKMAT) November 15, 2019