Maharashtra Election, Maharashtra CM: Sanjay Raut targets Devendra Fadnavis | Maharashtra CM: ''आम्ही ‘मी पुन्हा येईन’ असे वारंवार सांगणार नाही''
Maharashtra CM: ''आम्ही ‘मी पुन्हा येईन’ असे वारंवार सांगणार नाही''

मुंबई : राज्याच्या हितासाठी किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी वेळ लागतो. पाच वर्षे नाही तर पुढील २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा हीच आमची इच्छा आहे. मात्र आम्ही ‘मी पुन्हा येईन’ असे वारंवार सांगणार नाही, आम्हाला महाराष्ट्रात राहायचे आहे. राज्यातच राजकारण करायचे आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
राऊत म्हणाले की, महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला आहे. दुष्काळ, ओला दुष्काळ यावर जास्त करावा लागणार आहे. आमच्यासोबत जे लोक जोडले आहेत त्यांचा राज्य चालविण्याचा अनुभव जास्त आहे. २४ तारखेनंतर मी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत सांगत आलो आहे की, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार.
ज्या बातम्या पेरल्या जातायेत त्या कुठून येतात माहिती आहे. महाराष्ट्राच्या योगदानात यशवंतराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे, महाराष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येकाचा वाटा राहिला आहे. फॉर्म्युल्याची चिंता नको, त्यावर उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra CM: Sanjay Raut targets Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.