Maharashtra Election 2019: मुंबईत राज ठाकरेंची तोफ धडाडणार; उद्या होणार प्रचारसभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 20:20 IST2019-10-09T20:16:46+5:302019-10-09T20:20:19+5:30
Maharashtra Election 2019: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पावसामुळे रद्द करण्यात आली होती.

Maharashtra Election 2019: मुंबईत राज ठाकरेंची तोफ धडाडणार; उद्या होणार प्रचारसभा
मुंबई: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मनसेप्रमुखराज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पावसामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र पुण्यात सभा रद्द झाल्यानंतर मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या पुढील सभा मुंबईत आयोजित करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील राज ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वीच पावसाने तुफान हजेरी लावली. यानंतर अखेर सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर आता राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीची पुढील दोन सभा मुंबईतील सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये आणि गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आल्या आहेत.
#राजठाकरे#मनसे#रेल्वेइंजिन#विधानसभानिवडणूक२०१९ 🚂 pic.twitter.com/DrbqKuOe9Q
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 9, 2019
राज्यभरातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील राज ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वीच पावसाने तुफान हजेरी लावली. सकाळी पडलेल्या पावसाने मैदानावर चिखल झाल्याने तसेच पाणी साठल्याने कार्यकर्त्यांनी मैदान भुसा, खडी व मोठमोठे फ्लेक्स टाकून व्यवस्थित करून घेतले होते. परंतु, संध्याकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची दाणादाण उडाली होती. त्यानंतर अखेर पुण्यातील राज ठाकरेंची पहिली सभा रद्द करण्यात आली होती.