Nana Patole: पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था; नाना पटोलेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 14:13 IST2021-08-30T14:13:02+5:302021-08-30T14:13:54+5:30
Nana Patole: राज्यातील मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे.

Nana Patole: पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था; नाना पटोलेंचा घणाघात
Nana Patole: राज्यातील मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपा सत्तेसाठी कासावीस झाला आहे. पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, अशी भाजपाची अवस्था झाली आहे, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. (Maharashtra Congress chief nana patole attacks bjp over temple agitation)
देवेंद्र फडणवीस यांनी १५ ऑगस्ट रोजी मंत्रालयावर झेंडा फडकवणार असल्याची घोषणा केली होती. यातूनच त्यांना सत्तेची लालसा किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येतं. लोकं मेली तरी त्यांना त्याचं काही घेणंदेणं नाही, असंही नाना पटोले म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राज्य सरकारनं कोणत्याही धर्माच्याबाबतीत भेदभाव केलेला नाही. भाजपकडून जाणूनबुजून हिंदू-मुस्लिम वाद लावून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ईदच्यावेळीही बंधनं आणली होती. बकरी ईदच्या वेळी मुस्लिमांमध्येही रोष निर्माण झाला होता. पण राज्य सरकार नरमलं नाही. त्यांना प्रतिकात्मक कुर्बानी देण्याचं आवाहन सरकारनं केलं होतं. त्याबाबतचं पत्रक देखील सरकारनं काढलं हतं. पण भाजपाकडून जाणूनबुजून हिंदू-मुस्लीम वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं नाना पटोले म्हणाले.