Join us

Maharashtra CM: 'ज्या कपिल सिब्बलांना दारु पिलेलं म्हटलं त्यांनाच शिवसेनेनं वकीलपत्र दिलं' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 16:42 IST

Maharashtra News: त्याचसोबत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढील ५ वर्ष राज्याला स्थिर सरकार देतील.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाविरुद्ध शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारविरोधात तीन पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडत आहेत यावरून भाजपाने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटलं की, ज्या कपिल सिब्बलनी भगवान श्रीराम काल्पनिक आहेत, त्यांचं मंदिर बांधू नये म्हटलं होतं, त्यांच्यावर संजय राऊतांनी 'सामना'त अग्रलेख लिहिला होता, तेच सिब्बल आता शिवसेनेचे वकील आहेत. संजय राऊत यांनीच तेव्हा त्यांना दारु पिलेला म्हटले होतं असा टोला दानवेंनी संजय राऊत यांना लगावला आहे. 

तसेच संजय राऊत संजय राऊतांनी जास्त बोलू नये, राऊतांना उपचाराची गरज आहे. त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. त्याचसोबत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढील ५ वर्ष राज्याला स्थिर सरकार देतील. ज्या दिवशी राज्यपालांकडे भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला. त्यावेळी अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते होते. त्यांच्या ५४ आमदारांचे पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. आजही अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यामुळे अजितदादा जो व्हिप देतील तोच व्हिप राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार आहे. अजित पवारांना सत्तास्थापनेचा पूर्णपणे अधिकार होता असंही दानवेंनी स्पष्ट केलं आहे. 

राज्यातील सत्तास्थापनेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, बहुमत नसतानाही भाजपाने सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी सभागृहात फ्लोअर टेस्ट देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी विरोधकांनी केली आहे. रविवारी आणि सोमवारी या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली असून मंगळवारी सुप्रीम कोर्ट याबाबतची निर्णय देणार आहे. 

दरम्यान,अजित पवारांबरोबर गेलेले सर्वच लोक परतले आहेत. गुरुग्रामच्या हॉटेलमधल्या ओबेरॉयमधील रुम नंबर 5117मध्ये ऑपरेशन सुरू होतं. शिवसेना-राष्ट्रवादीचे प्रमुख लोक तिथे पोहोचले होते, त्यांनीच त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे. महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रिपद किंवा सत्ता मिळवण्यासाठी या देशातले राज्यकर्ते कोणत्या थराला जात आहेत. हे चित्र घृणास्पद आहे अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली आहे. 

महत्वाच्या बातम्या 

छाती फोडली तर शरद पवारच दिसतील; 'त्या' आमदाराने सांगितली 'अपहरणा'ची आपबिती

संजय राऊतांना वेड्याच्या इस्पितळात भरती करा, दानवेंची जहरी टीका

'...त्यापेक्षा स्फोटकं आणून सगळ्यांना एकाच झटक्यात मारून टाका'; सुप्रीम कोर्टाचा संताप

भाजपासोबत जाण्याचं राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं; अजितदादांनी केले अनेक गौप्यस्फोट, म्हणाले...

'शेतकऱ्याच्या एकाच मुलाने शेती करावी अन् दुसऱ्यानं उद्योग-धंदा'

टॅग्स :रावसाहेब दानवेसंजय राऊतशिवसेनासर्वोच्च न्यायालयकपिल सिब्बलमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019