मुंबईतील ६ लोकसभा मतदार संघांमध्ये २० मे रोजी मतदान! 'असा' आहे निवडणूक कार्यक्रम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 16:58 IST2024-03-16T16:52:01+5:302024-03-16T16:58:37+5:30

Loksabha Elections 2024, Mumbai: केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.

loksabha election 2024 Voting in 6 Lok Sabha constituencies in Mumbai on May 20 | मुंबईतील ६ लोकसभा मतदार संघांमध्ये २० मे रोजी मतदान! 'असा' आहे निवडणूक कार्यक्रम...

मुंबईतील ६ लोकसभा मतदार संघांमध्ये २० मे रोजी मतदान! 'असा' आहे निवडणूक कार्यक्रम...

मुंबई-

Loksabha Elections 2024, Mumbai: केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १८ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. यात मुंबईतील ६ मतदार संघांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. म्हणजेच मुंबईत २० मे रोजी मतदान होईल. मुंबईतील ६ जागांसोबतच मुंबई महानगर प्राधिकरणाअंतर्गत (MMR) येणाऱ्या ठाणे, पालघर, भिवंडी, कल्याण या ठिकाणीही २० मे रोजी मतदान होईल हे स्पष्ट झालं आहे. 

'मतसंग्रामा'चा शंखनाद! लोकसभा निवडणूक ७ टप्प्यांत, महाराष्ट्रात 'या' तारखांना मतदान; निकालाचा दिवसही ठरला

मुंबईतील लोकसभा मतदानाचे वेळापत्रक
- नोटिफिकेशनची तारीख: २६ एप्रिल २०२४
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख- ३ मे २०२४
- अर्ज छाननी: ४ मे २०२४
- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ६ मे २०२४
- मतदानाची तारीख- २० मे २०२४
- मतमोजणी- ४ जून २०२४

महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान

पहिला टप्पा - १९ एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा २६ एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी
तिसरा टप्पा ७ मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा १३ मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा २० मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Web Title: loksabha election 2024 Voting in 6 Lok Sabha constituencies in Mumbai on May 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.