व्हिडीओ व्हॅन, हेलिकॉप्टरमधून लोकसभेचा प्रचार, निवडणुक प्रचारासाठी लागतात विविध २१ परवानग्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 10:12 AM2024-05-07T10:12:58+5:302024-05-07T10:17:50+5:30

लोकसभा निवडणुकीचा जोर.

lok sabha election 2024 political activist are scrambling to get various permits for campaigning | व्हिडीओ व्हॅन, हेलिकॉप्टरमधून लोकसभेचा प्रचार, निवडणुक प्रचारासाठी लागतात विविध २१ परवानग्या

व्हिडीओ व्हॅन, हेलिकॉप्टरमधून लोकसभेचा प्रचार, निवडणुक प्रचारासाठी लागतात विविध २१ परवानग्या

मुंबई:मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर धरू लागला आहे. प्रचारासाठीच्या विविध परवानग्या मिळवण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांची घालमेल सुरू आहे. अशात प्रचाराचे नवे तंत्र वापरत व्हिडीओ व्हॅन, हेलिकॉप्टरमधून प्रचार करण्यासाठी परवानग्या देण्यात आल्या आहेत. यासाठी विविध स्वरूपांच्या २१ परवानग्या घ्यावा लागतात.

काही परवानग्या मुंबई महापालिकेत एक खिडकी योजनेत आहेत तर, काही जिल्हाधिकारी स्तरावर आहेत. राजकीय उमेदवारांना प्रचारासाठी परवानग्या सहजतेने मिळाव्यात म्हणून मुंबई महापालिकेत एक खिडकी योजनेत एकूण १२ परवानग्या दिल्या जात आहेत. सर्वसाधारण परवानग्याप्रमाणे उपजिल्हाधिकारी स्तरावरसुद्धा विशेष परवानग्या देण्यात येत आहेत.

१) प्रचारात हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार असेल तर त्यासाठी उपनिवडणूक जिल्हा अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. 

२) काही परवानग्या पोलिस विभागाकडून दिल्या जात आहेत.

या आहेत परवानग्या-

१) फलक डिजिटल बोर्ड

२) वाहन 

३) पदयात्रा, रॅली 

४) प्रचारसभा, मेळावे 

५) कार्यालये

६) व्हिडीओ व्हॅन 

 ७) हेलिकॉप्टर

८) हेलिपॅड 

९) पक्ष कार्यालय

१०)  जाहीरनामा, पत्रक वितरण 

११)  लाऊड स्पीकर्स

१२) जाहीर बैठकीसाठी परवानगी 

१३) बॅनर्स

१४)  निवडणूक इलेक्शन एजंट

Web Title: lok sabha election 2024 political activist are scrambling to get various permits for campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.