वायकर यांच्या रोड शो मध्ये मुख्यमंत्री सहभागी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
By मनोहर कुंभेजकर | Updated: May 16, 2024 16:46 IST2024-05-16T16:44:55+5:302024-05-16T16:46:41+5:30
काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री व शिंदे सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जोगेश्वरी पूर्व-अंधेरी पूर्व या विधानसभा क्षेत्रात रोड शो काढण्यात आला होता.

वायकर यांच्या रोड शो मध्ये मुख्यमंत्री सहभागी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
मनोहर कुंभेजकर, मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री व शिंदे सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जोगेश्वरी पूर्व-अंधेरी पूर्व या विधानसभा क्षेत्रात रोड शो काढण्यात आला होता.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते अर्जुन खोतकर, माजी खासदार संजय निरुपम आदी वरिष्ठ नेते व हजारोंच्या संख्येने येथील नागरिक व महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या रोड शो मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सामील झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे व जल्लोषाचे चित्र रोड शो मधून दिसून आले. विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला होता.
यावेळी शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी, रिपाई, रासप चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रोडशो मध्ये सुमारे ८०० बाईकस्वर आणि ४०० रिक्षा चालक ही सहभागी झाले होते.
जोगेश्वरी पूर्व मेघवाडीपासून निघालेला हा रोड शो, पंप हाऊस, शेरे पंजाब बिंद्रा कॉम्प्लेक्स, अंधेरीतील एमआयडीसी मार्गे सुभाष नगर येथे येऊन समाप्त झाला.