Lockdown News: तळीरामांनो! आता घरबसल्या मागवा दारू; राज्यात ऑनलाइन विक्री सुरू करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:27 AM2020-05-07T07:27:28+5:302020-05-07T07:28:42+5:30

दारू दुकाने सर्वत्र सुरू होणार

Lockdown News: Online liquor sales to start in the state; Also sold from beer shops | Lockdown News: तळीरामांनो! आता घरबसल्या मागवा दारू; राज्यात ऑनलाइन विक्री सुरू करणार

Lockdown News: तळीरामांनो! आता घरबसल्या मागवा दारू; राज्यात ऑनलाइन विक्री सुरू करणार

googlenewsNext

यदू जोशी

मुंबई : दारू हा राज्याच्या उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असून सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत महसुली उत्पन्न वाढवायचे असेल तर दारू दुकाने सुरू करण्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका राज्य मंत्रिपरिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत काही मंत्र्यांनी व्यक्त केली. योग्य नियोजन करून ही दुकाने मुंबईसह राज्यभर सुरू करण्याबाबत एकमत झाले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

याशिवाय ऑनलाइन पद्धतीने दारू विक्री करण्यास अनुमती देण्यात येणार आहे मात्र तत्पूर्वी त्यासाठी इतर राज्यांनी अवलंबिलेल्या पद्धतीची माहिती घेतली जाईल. तसेच दारू दुकानांवरील उसळत असलेली गर्दी कमी करण्यासाठी काही काळ बीअर शॉपीमधून दारूची विक्री करण्यास परवानगी दिली जावी असेही बैठकीत ठरले सूत्रांनी सांगितले. राज्यात ४९४७ बीअर शॉपी आहेत. विदेशी मद्य
विक्रीची १६८५ दुकाने आहेत.

आजच्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेऊनही काही जिल्ह्यांमध्ये ती सुरू करण्यात आली नसल्याबद्दलचा विषय उपस्थित केला. दारूची दुकाने एरवीही सुरुच असतात. लॉकडाउनच्या काळात ज्या ठिकाणी ही दुकाने सुरू झाली तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला हे खरे असले तरी योग्य नियोजन केले असते तर गोंधळ टाळता आला असता, असे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले. योग्य नियोजन करून तसेच उत्पादन शुल्क विभागाने काढलेल्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करून ही दुकाने कंटेनमेंट झोन वगळता लवकरात लवकर सुरू करावीत, असा सूर बैठकीत व्यक्त झाला. त्यानुसार येत्या एक-दोन दिवसात स्पष्ट निर्देश जारी होण्याची शक्यता आहे.

शासनाच्या भूमिकेकडे लक्ष्य
एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘लोकमत’ला सांगितले की राज्याचे महसुली उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी झाले असताना दारूपासून उत्पादन शुल्क व विक्री कर मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. आज त्याची गरज आहे. शिवाय दारूविक्री बंद असल्यामुळे गावठी, अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. जनतेच्या दृष्टीने तेही योग्य नाही. पश्चिम बंगाल, छत्तीसगड यासारख्या काही राज्यांनी ऑनलाइन दारू विक्रीला परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ऑनलाइन विक्री सुरू केली जाईल. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आजच ऑनलाइन दारू विक्रीबाबत आदेश काढला आहे

Web Title: Lockdown News: Online liquor sales to start in the state; Also sold from beer shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.