lockdown News: लॉकडाऊनमध्येही मेट्रोच्या कामांना गती; प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा MMRDA चा मानस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 02:07 AM2020-05-04T02:07:50+5:302020-05-04T02:08:09+5:30

कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेऊन कामे सुरू

lockdown News: Metro works speed up even in lockdown; MMRDA intends to complete the project on time | lockdown News: लॉकडाऊनमध्येही मेट्रोच्या कामांना गती; प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा MMRDA चा मानस

lockdown News: लॉकडाऊनमध्येही मेट्रोच्या कामांना गती; प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा MMRDA चा मानस

googlenewsNext

मुंबई : लॉकडाउन दरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) विविध प्रकल्पांची कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतील मेट्रो प्रकल्पांच्या कामांनाही आता गती आली आहे. हे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एमएमआरडीएने या कामांना वेग दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकारने देशभरामध्ये तिसऱ्यांदा लॉकडाउनमध्ये वाढ केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने लॉकडाउन घोषित केल्यावर सर्व वाहतुकीसह विविध प्रकल्पांच्या कामांनाही अंशत: स्थगिती दिली होती. यानंतर मात्र ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव नसेल अशा भागांत काम करण्यास नंतर परवानगी देण्यात आली. यानंतर एमएमआरडीए प्राधिकरणाने सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत प्रकल्पांची कामे सुरू केली. एमएमआरडीएचे बहुतांश प्रकल्प हे भरवस्तीत नसून महामार्गांवर असल्याने प्रकल्पांची कामे सुरू केली. आता मेट्रो प्रकल्पांची कामे वेळेमध्ये पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट असल्याने मेट्रोची कामे वेगाने सुरू केली आहेत.

मुंबई आणि मुंबई नजीकच्या भागांमध्ये विविध ठिकाणी चौदा मेट्रो मार्गिकांचे जाळे उभारले जात आहे. यामध्ये कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही मेट्रो-३ मार्गिका मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) उभारली जात आहे. तर वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या कार्यान्वित असलेल्या मेट्रो-१ची जबाबदारीही मुंबई मेट्रो वनवर आहे. बाकी उर्वरित मेट्रो मार्गिकांची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. लॉकडाउनमुळे या मेट्रो मार्गिकांचे काम काही काळ थांबले होते.

मार्गिकांचे काम रखडल्याने या प्रकल्पांच्या खर्चामध्ये वाढ होणार असून प्रकल्पाचा कालावधी वाढणार आहे. हा कालावधी जास्त वाढू नये आणि प्रकल्पांच्या खर्चामध्येही वाढ होऊ नये म्हणून एमएमआरडीए आता जोमाने कामाला लागली आहे़
कामे वेळेत झाली तरच मुंबईकरांना दर्जेदार सेवा लवकरात लवकर मिळू शकणार आहे़

नियमांचे पालन करत कामे
प्राधिकरणाने सर्व नियमांचे काटेकोर पालन करत प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत कामे करण्यात येत आहेत. तसेच सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. यासह स्थानिक पोलीस आणि स्थानिक अ‍ॅथॉरिटीला पत्र देऊन कळवणे, कामगारांचे कार्ड बनवणे, कामगारांची यादी देणे अशा विविध प्रक्रिया पार पाडून नियमांनुसार कामांना सुरुवात करण्यात
आली आहे.

कामगारांची विशेष काळजी
विविध प्रकल्पांची कामे करणाºया कामगारांची एमएमआरडीएमार्फत विशेष काळजी घेतली जात आहे. कामगारांची वेळोवेळी डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक सर्व गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. त्यांची राहण्याचीही सोय करण्यात आली असून त्यांना स्वच्छतेचे धडेही दिले जात आहेत.

मेट्रो मार्गिकांच्या कामांना वेग
१)डीएन नगर ते मंडाले दरम्यानच्या मेट्रो-२ बी मार्गिकेवर गर्डरच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे, तर वडाळा-घाटकोपर-ठाणे कासारवडवली मेट्रो-४ मार्गिकेवरही गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात येत आहे.
२)तर दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो-७ मार्गिकेच्या कामालाही वेग आला आहे. यासह या मार्गिकेवरील स्थानकांमध्ये बसवण्यात येणाºया एक्सलेटरपैकी १२ एक्सलेटर नुकतेच आणण्यात आले असून, दोन लिफ्ट आणण्यात
आल्या आहेत.
३)आता हे बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यासह इतर मेट्रो मार्गिकांच्या कामांनाही वेग आला आहे. तसेच लॉकडाउन संपल्यावर मोनो सुरू झाल्यावर प्रवाशांना चांगली आणि सुरक्षित सेवा मिळावी म्हणून एमएमआरडीएतर्फे मोनो दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
४)यामुळे मोनोरेलच्या सेवेत सुधारणा झाल्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळून दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएने मोनोची चाचणीही घेतली होती. एमएमआरसीनेही मेट्रो-३ मार्गिकेच्या कामाला सुरुवात केली आहे.

Web Title: lockdown News: Metro works speed up even in lockdown; MMRDA intends to complete the project on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.