Lockdown: Light ... Camera ... Action ...! Shooting of hundreds of TV series from today | Lockdown: लाईट... कॅमेरा... अ‍ॅक्शन...! शंभरावर टीव्ही मालिकांचे आजपासून शूटिंग

Lockdown: लाईट... कॅमेरा... अ‍ॅक्शन...! शंभरावर टीव्ही मालिकांचे आजपासून शूटिंग

मुंबई : अनलॉकडाऊनमध्ये प्रत्येक क्षेत्र हळूहळू खुले होत असून तब्बल अडीच लाख लोकांचा कोरोना विमा उतरवून मनोरंजन क्षेत्रानेही पुन:श्च हरिओम केले आहे. लाईट... कॅमेरा... अ‍ॅक्शन... म्हणत नियमांचे पालन करत आजपासून जवळपास ११० टीव्ही मालिकांचे शूटिंग सुरू होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शूटिंग सुरू करण्याबाबत जीआर निघाल्यानंतर आरोग्य विभागाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या, त्यानुसार काही मालिकांचे आधीच शूटिंग सुरू झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यास उपचारासाठी २ लाख तर दुर्दैवाने मृत्यू झाल्यास २५ लाखांच्या विम्याचे कवच टीव्ही मालिकांच्या निर्मात्यांच्या पुढाकारातून कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आले आहे.

टीव्ही व वेब मालिका, विविध शो यांचे शुटिंग प्रामुख्याने मुंबई, ठाणे, मीरारोड, नायगाव व डहाणू (पालघर), सांगली, सातारा, कोल्हापूर येथे होते. अनेक निर्मात्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मालिकेतील कर्मचाऱ्यांची चार महिने राहण्याची व जेवणाची व्यवस्था सेटच्या जवळच केली आहे. त्यासाठी बंगले, फ्लॅट भाड्याने घेतले आहेत, टीव्ही मालिकांचे निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितले.

कॅमेरा व कपडेपटापासून सर्व साहित्याचे सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. राहण्याच्या ठिकापासून शुटिंगच्या ठिकाणी कर्मचाºयांना आणण्यासाठीची वाहने सॅनिटेशन केलेली आहेत. सर्व कर्मचारी मास्कचा वापर तसेच मेकअपमन पीपीई किटचा वापर करत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात मालिकांच्या निर्मात्यांनी आरोग्याची काळजी घेण्याबाबत डॉक्टरांचे वेबिनारही घेतले. त्याचाही कर्मचाºयांना चांगला फायदा झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन मनोरंजन क्षेत्राचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले. टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात सुदैवाने कोणाचाही कायमचा रोजगार गेलेला नाही. सर्व घटकांना पुन्हा काम मिळत आहे. सर्व टीव्ही चॅनेलचे सीईओ व आम्ही सर्व निर्मात्यांनी एकत्रितपणे बैठक घेऊन मालिकांचे शुटिंग हळूहळू सुरू केले आहे. १३ जुलैपासून मालिकांचे नवे भाग छोट्या पडद्यावर येतील. त्यामुळे प्रेक्षकसंख्या वाढण्यासही मदत होईल. - नितीन वैद्य, टीव्ही मालिकांचे निर्माते

फिजिकल डिस्टन्सिंग

  • टीव्ही मालिकांचे कलावंत साधारणपणे १२ तास शूटिंगच्या ठिकाणी असतात.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कर्मचारी, तंत्रज्ञांची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था निर्मात्यांनीच केली.
  • चार महिन्यांसाठी बंगले व फ्लॅट भाड्याने घेण्यात आले आहेत.
  • शूटिंगच्या टीमव्यतिरिक्त कोणाशीही संपर्क येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
     

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lockdown: Light ... Camera ... Action ...! Shooting of hundreds of TV series from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.